Rain Update : दक्षिण कोकणात दमदार पाऊस

दक्षिण कोकणात जोर कायम असल्याने सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : दक्षिण कोकणात जोर कायम (Rain Force) असल्याने सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी दमदार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी १०० पेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने अतिवृष्टी झाली आहे. तर विदर्भातही पावसाच्या सरी कोसळल्या असून, उर्वरित राज्यात पावसाची उघडीप असल्याचे दिसून आले.

गुरुवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे सर्वाधिक १८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस पडला. रत्नागिरीतील जगबुडी, अर्जुना, वाशिष्टी, काजळी या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. या पावसाने भात लावणीच्या (Paddy Planting) कामांना वेग येणार आहे.

Rain Update
Rain Update :मुळशी धरण पाणलोट क्षेत्रात मध्यम पाऊस

पूर्व विदर्भात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी ऊन, सावल्यांपाठोपाठ तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाच्या सरी कोसळत आहेत.

गुरुवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :

मुंबई शहर : सांताक्रूझ ४१.

पालघर : तलासरी ५६, विक्रमगड ४२.

रायगड : अलिबाग १३०, माणगाव ६४, माथेरान ४४, म्हसळा ९५, मुरूड ९६, श्रीवर्धन १४४, सुधागडपाली ८०, तळा १४६, उरण ७०.

रत्नागिरी : चिपळूण ६८, दापोली ४९, हर्णे १०५, लांजा १४५, मंडणगड ४७, राजापूर ६५, रत्नागिरी १०४, संगमेश्‍वर ४१.

सिंधुदुर्ग : देवगड १८४, कणकवली ८२, कुडाळ १११, मालवण ११२, मुलदे (कृषी) ५७, रामेश्‍वर ६९, सावंतवाडी ७९, वैभववाडी ७३, वेंगुर्ला ७९.

ठाणे : कल्याण ४७, ठाणे ६८.

मध्य महाराष्ट्र :

सांगली : जत ४२.

सातारा : महाबळेश्‍वर २९.

सोलापर : माळशिरस २८.

मराठवाडा :

बीड : धारूर २२, वाडवणी २६.

नांदेड : माहूर ३०.

विदर्भ :

अमरावती : चिखलदरा २२.

भंडारा : तुमसर २२,

चंद्रपूर : भद्रावती २२, गोंडपिंपरी २२, मूल ३९, नागभिड ३३, पोंबुर्णा ७५, सावळी ६२, सिंदेवाही ४३, वरोरा २२

गडचिरोली : आरमोरी ३२, देसाईगंज वडसा ६८, गडचिरोली ३९.

गोंदिया : गोंदिया २१, तिरोडा २८.

नागपूर : रामटेक ३७.

१०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे :

देवगड १८४, मालवण ११२, कुडाळ १११, (जि. सिंधुदुर्ग), तळा १४६, श्रीवर्धन १४४, अलिबाग १३०, (जि. रायगड), लांजा १४५, हर्णे १०५, रत्नागिरी १०४, (जि. रत्नागिरी).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com