Crop Damage : ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीचा ५ हजार हेक्टरला फटका

जिल्ह्यात ६ ते १० ऑगस्ट या कालावधीत विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. येवला तालुक्यात मका व सोयाबीन पिकांचे यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon

नाशिक : जिल्ह्यात ६ ते १० ऑगस्ट या कालावधीत विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. येवला तालुक्यात मका (Maize) व सोयाबीन (Soybean) पिकांचे यामध्ये सर्वाधिक नुकसान (Crop Damage Due To Heavy Rain) झाले. कृषी विभागाने (Agriculture Department) दिलेल्या नुकसानीच्या प्राथमिक माहिती अहवालानुसार, जिल्ह्यात ५,७६५ हेक्टरवर नुकसान झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या झाल्यानंतर अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडल्याची स्थिती आहे.

Crop Damage
Crop Damage : अतिवृष्टीमुळे १.१५ लाख हेक्टरवर नुकसान

जूनमध्ये प्रामुख्याने झालेले नुकसान हे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात होते तर ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान हे जिल्ह्याच्या पूर्व भागात झाले. जिल्ह्यात १२१ गावांमधील ७,९६६ शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. ज्यामध्ये सर्वाधिक नुकसान येवला तालुक्यात आहे. याशिवाय सटाणा, मालेगाव व चांदवड तालुक्यात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. जिरायती पिकांमध्ये मका व सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान आहे. तर बाजरी, तूर, भुईमूग व कापूस पिकाचे नुकसान आहे.

Crop Damage
Crop Damage : समृद्धी महामार्गावरील पाणी शेतात; पिकांचे नुकसान

बागायती पिकांमध्ये टोमॅटो, भाजीपाला पिकांचे नुकसान अधिक आहे. याशिवाय खरीप हंगामातील रोपवाटिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संभाव्य कांदा लागवडीवर परिणाम होणार आहे. बहुवार्षिक फळपिकांमध्ये सटाणा तालुक्यात डाळिंब व द्राक्ष पिकांचे नुकसान अधिक आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात येवला तालुक्यातील अनेक शेतकरी शेतीसाठी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असतात; मात्र या भागातच मका व सोयाबीन पिकांचे नुकसान अधिक असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

पीकनिहाय बाधित क्षेत्र

पीक...क्षेत्र (हेक्टरमध्ये)

मका...३,२०१

भात...१८

बाजरी...२३५

भुईमूग...६५

सोयाबीन...१४७३

तूर...१

कापूस...२३०

कांदा रोपे...२०

टोमॅटो...३७०

भाजीपाला ८७

द्राक्षे...७

डाळिंब...५८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com