Heavy Rain : पाच जिल्ह्यांत पुन्हा सर्वदूर पाऊस

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी तीन मंडले वगळता ६२ मंडलांत हलका मध्यम दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील पैठण तालुक्यांतर्गत येणाऱ्या पिंपळवाडी मंडलात ७०.५ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

औरंगाबाद ः मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांत काही मंडलांत अपवाद वगळता सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने (Rainfall Marathwada) सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. दुसरीकडे औरंगाबाद, लातूर व जालना या तीन जिल्ह्यांतील प्रत्येकी एका मंडलात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली.

Heavy Rain
Soybean: सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोग पडलाय का ?

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी तीन मंडले वगळता ६२ मंडलांत हलका मध्यम दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील पैठण तालुक्यांतर्गत येणाऱ्या पिंपळवाडी मंडलात ७०.५ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली. पैठण व वैजापूर तालुक्यांत पावसाची दमदार हजेरी लागली. या दोन तालुक्यांसह इतर तालुक्यांतील मिळून १४ मंडलांत २० ते ५१ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील सर्व ३९ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. जालना शहर मंडलात सर्वाधिक ७२ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली.

Heavy Rain
Seed : घरचे बियाणे वापरल्याने वाशीम जिल्ह्यात वाचले ४० ते ४२ कोटी

याव्यतिरिक्त जिल्ह्यातील भोकरदन, जालना व मंठा तालुक्यातील प्रत्येकी एक मंडळ मिळून तीन मंडलांत २८ ते ४६ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील सर्व ६३ पैकी ६२ मंडलांत हलका, मध्यम, दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील १३ मंडलांत ३० ते ५६ मिलिमीटर दरम्यान तर आठ मंडलांत २० ते ३० मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. परळी, केज, शिरूर कासार तालुक्यांत पावसाचा जोर सर्वाधिक होता.

लातूर जिल्ह्यातील सर्व साठ मंडलांत हलका, मध्यम, दमदार पाऊस झाला. उदगीर तालुक्यातील हेर मंडलात सर्वाधिक ६७.५ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली. इतर २१ मंडलांत २० ते ५१ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. उदगीर व चाकूर तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत पावसाचा जोर अधिक होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व ४२ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील १६ मंडलांत १५ ते ४६ मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली. तुळजापूर, उमरगा तालुक्यांत इतर तालुक्यांच्या तुलनेने पावसाचा जोर अधिक होता.

जिल्हानिहाय पाऊस झालेली मंडले (पाऊस मिलिमीटरमध्ये)

औरंगाबाद जिल्हा

हर्सूल ३१, लोहगाव ३७, ढोरकीन ४७, बिडकीन २६.५, पैठण ४१.८, पाचोड २३.३, सिद्धनाथ वडगाव ३९.३, वैजापूर ३३.५, खंडाळा ४४.८, बोरसर ५१, गरज ४३.३, लाडगाव ३२.

...

जालना जिल्हा

राजूर ४४.५, रामनगर ४६.५, तळणी २८.३.

...

बीड जिल्हा

बीड ४२.५, राजुरी ३६, मांजरसुंबा ४२.५, अमळनेर २१.३, कडा ५०, पिंपळा २९, पाचेगाव ४०.३, गंगामसला २९.३, कीट्टीवडगाव २२.८, पाटोदा ३४, युसूफ वडगाव २६.८, हनुमंत पिंपरी ४९.५, विडा ४९.५, परळी ३०.८, धर्मापुरी २५, नागापूर ५६.५, धारूर ४९, शिरूर कासार ४२.८, रायमोहा ३७.८.

...

लातूर जिल्हा

बाभळगाव २३, उदगीर ४३.३, नागलगाव २६.८, देवर्जन २४.५, तोंडार ४३.३, चाकूर २४.५, नळेगाव २४.५, वडवळ ३०.५, शेलगाव ५१.५, आष्टा २०.३, पानगाव २२, पळशी २६.३, बारूळ २१, शिरूर ताजबंद २४.३, साकोळ २०.३.

...

उस्मानाबाद जिल्हा

सावरगाव ३७, जळकोट ४३.३, नळदुर्ग ४६.३, दाळिंब ३१, मुरूम २६.५, जेवळी ३१.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com