Rain Update : मुसळधार पावसाने दाणादाण

राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. सकाळपासून उन्हाचा चटका, ढगांची दाटी झाल्याने वाढलेला उकाडा आणि दुपारनंतर वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची हजेरी असे चित्र राज्याच्या विविध भागांत पाहायला मिळत आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : राज्यात पावसाचे पुनरागमन (Rainfall) झाले आहे. सकाळपासून उन्हाचा चटका (Temperature), ढगांची दाटी (Cloudy weather) झाल्याने वाढलेला उकाडा (Heat) आणि दुपारनंतर वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची (Rainfall With Lightning) हजेरी असे चित्र राज्याच्या विविध भागांत पाहायला मिळत आहे. कमी काळात पडणाऱ्या जोरदार पावसाने दाणादाण केली. वाढीच्या अवस्थेतील खरीप पिके, भाजीपाला, चारा पिकांना फटका (Crop Damage) बसला आहे. पावसाची दडी असलेल्या भागात मात्र हा पाऊस लाभदायक ठरणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी शहरात मंगळवारी (ता. ६) दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. तासभर पडलेल्या या पावसाने शहरात जिकडे तिकडे पाणीच पाणी, अशी स्थिती निर्माण झाली. जिल्ह्याच्या अन्य काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढत असून, समुद्रातदेखील वादळी स्थिती निर्माण झाली आहे. सह्याद्री पट्ट्यातील गावांना देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

समुद्र देखील असल्याचे चित्र आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे ९० मिलिमीटर, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्‍वर येथे ९०, तर चिपळूण येथे ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या पेडगाव येथे सर्वाधिक १०० मिलिमीटर, नगर जिल्ह्यातील राहाता येथे ८० मिलिमीटर, साताऱ्यातील खंडाळा आणि कोल्हापूरमधील चंदगड येथे प्रत्येकी ६० मिलिमीटर पाऊस पडला. पुणे जिल्ह्यात पुन्हा जोर वाढला आहे.

Rain Update
Rain Update : नांदेड जिल्ह्यात तुरळक पाऊस

बुधवारी (ता.७) सकाळी आठ वाजेपर्यंत पुरंदर, दौड, शिरूर, जुन्नर, भोर, पुणे शहर, बारामती या तालुक्यांत जोरदार पाऊस पडला. बारामती भागात ओढ्यांना पूर आल्याने पर्यायी रस्ते शोधावे लागले. पुरंदर तालुक्यात नीरा, गुळुंचे, बारामती तालुक्यातील निंबूत, फरांदेनगरपासून करंजेपूलपर्यंत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला. संध्याकाळी ओढ्या नाल्यांना पूर आला.

Rain Update
Rain : राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात जोरदार पावसामुळे मोठी दैना झाली आहे. तर मराठवाड्यात औरंगाबाद येथे ६० मिलिमीटर, तसेच जालन्यातील बदनापूर, परभणीतील जिंतूर येथे प्रत्येकी ५० मिलिमीटरची नोंद झाली. विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

बुधवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : वैभववाडी, संगमेश्‍वर ९०, चिपळूण ८०, कुडाळ ५०, पोलादपूर ४०

मध्य महाराष्ट्र : पेडगाव १००, राहाता ८०, खंडाळा, चंदगड प्रत्येकी ६०, पन्हाळा, वाई, पाटण प्रत्येकी ४०, मोहोळ, सिन्नर, सोलापूर, तासगाव, सासवड प्रत्येकी ३०.

मराठवाडा : औरंगाबाद ६०,बदनापूर, जिंतूर प्रत्येकी ५०, पाथरी, घनसांगवी, लोहारा प्रत्येकी ४०, मंथा ३०.

विदर्भ : खारंघा ३०, देऊळगाव राजा, रिसोड प्रत्येकी २०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com