जेऊर, मिरी मंडलांत पहिल्याच दिवशी अतिवृष्टी

नगर जिल्ह्यात (शनिवारी) रात्री जोरदार पाऊस झाला. नगर तालुक्यातील जेऊर, बहिरवाडी, ससेवाडी आदी भागांत दोन तासांतच सुमारे १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जामखेड तालुक्यातील नायगाव, अरणगाव, नायगाव भागांत जोरदार पाऊस झाला.
जेऊर, मिरी मंडलांत पहिल्याच दिवशी अतिवृष्टी
MonsoonAgrowon

नगर : नगर जिल्ह्यात शनिवारी (ता. ११) नगर, पाथर्डी, राहुरी, श्रीगोंदा, अकोले, जामखेड तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. नगर तालुक्यातील उत्तर भागात असलेल्या जेऊर महसूल मंडलात ढगफुटीसदृश पाऊस झाला. जेऊर, मिरी मंडलांत १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जामखेडमधील नायगाव मंडलातही अतिवृष्टी (Heavy Rains) झाली. जिल्हाभरातील चाळीसपेक्षा अधिक महसूल मंडलांत पावसाची हजेरी होती.

नगर जिल्ह्यात (शनिवारी) रात्री जोरदार पाऊस झाला. नगर तालुक्यातील जेऊर, बहिरवाडी, ससेवाडी आदी भागांत दोन तासांतच सुमारे १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जामखेड तालुक्यातील नायगाव, अरणगाव, नायगाव भागांत जोरदार पाऊस झाला. पाथर्डी तालुक्यातील मढी, तिसगाव, मिरी व त्यानंतर करंजी घाट परिसरात शनिवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह वरुणराजाने जोरदार हजेरी लावली.

मिरी मंडलात ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जोराच्या पावसासोबत वादळी वाराही जोरात होता. सुरवातीस दीड तास दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. जून महिना सुरू झाल्यानंतर हा पहिलाच पाऊस तिसगाव, करंजी परिसरात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसत होते. तर पावसामुळे शेतीच्या मशागतीला आता वेग येणार आहे.

शुक्रवारी थोडा तसेच शनिवारी सायंकाळी सहा वाजता पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे सुरू झालेला हा पाऊस करंजीकरांसाठी दिलासादायक ठरला. भोसे, दगडवाडी, वैजूबाभळगाव, देवराई, घाटशिरस, तिसगाव, मिरी, चिचोंडी परिसरांत पाऊस झाला. शनिवारी झालेल्या पावसामुळे ओढे-नाले खळखळून वाहिले. राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी तालुक्यांच्या अन्य भागांतही पावसाने हजेरी लावली. तर भिंगार मंडलात ४५ मिलिमीटर, जामखेड तालुक्यातील नायगाव महसूल मंडलात ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पहिल्यात पावसात गावतलाव, पाझर तलावात पाणी साठले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com