Rain Update : उत्तर महाराष्ट्र, घाटमाथ्यावर दमदार

उत्तर महाराष्ट्रासह, घाटमाथ्यावरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आला असून, अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
Rain Update : उत्तर महाराष्ट्र, घाटमाथ्यावर दमदार

पुणे : उत्तर महाराष्ट्रासह, घाटमाथ्यावरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस (Heavy Rain In Ghatmartha And Dam Catchment Area) सुरू आहे. या पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर (Flood In River) आला असून, अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गोदावरी, भिमेसह, कोयनेच्या पाणलोटातून होणाऱ्या पाण्याच्या पुरवठ्यामुळे (Water Supply) उजनी, जायकवाडीसह कोयना धरणाचा पाणीसाठा वेगाने वाढणार आहे.

सोमवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले. कोकणातील पालघर, रायगड जिल्ह्यात जोर अधिक होता. मात्र दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरूच होती. अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. तर उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर दमदार पाऊस झाला.

Rain Update : उत्तर महाराष्ट्र, घाटमाथ्यावर दमदार
कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस जोर धरणार

मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणासह प्रमुख धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीला पूर आला. तर पाणलोटातूनही पाण्याचा पुरवठा होत असल्याने साताऱ्यातील कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. भीमा नदीच्या खोऱ्यातील मुक्त पाणलोट क्षेत्रात भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.

गेले काही दिवस मराठवाड्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरल्याचे दिसून आले. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली, उर्वरित विदर्भात हलक्या ते मध्यम पाऊस झाला. भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणांचे १९ दरवाजे उघडण्यात आले.

सोमवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :

पालघर : जव्हार ९८, मोखाडा १२१, विक्रमगड ५७, वाडा ७८.

रायगड : कर्जत ८०, खालापूर ९२, माथेरान १२३, पनवेल ५७, रोहा ६६, सुधागडपाली ६७.

रत्नागिरी : चिपळूण ११३, खेड ९२, लांजा ५५.

सिंधुदुर्ग : दोडामार्ग ५५, मुलदे (कृषी) ५१.

ठाणे : आंबरनाथ ५०,शहापूर ५६.

मध्य महाराष्ट्र :

धुळे : साक्री ९८.

कोल्हापूर : आजरा ५५, गगणबावडा १०८, पन्हाळा ४०, राधानगरी ८५, शाहूवाडी ६९.

नंदूरबार : अक्कलकुवा १०१, अक्रणी ५८, नंदुरबार ५२, नवापूर ८६.

नाशिक : हर्सूल ४३, इगतपुरी १३२, नाशिक ७७, ओझरखेडा ८१, पेठ १२०, पिंपळगाव बसंवत ६४, सुरगाणा १७३, त्र्यंबकेश्वर १८२.

पुणे : घोडेगाव ४२, जुन्नर ४८, लोणावळा कृषी ९६, पौड ६०, तळेगाव ५९, वडगाव मावळ ७५, वेल्हे ८९.

सातारा : महाबळेश्वर १०६, पाटण ७४,वाई ६०.

मराठवाडा :

औरंगाबाद : सिल्लोड ३२.

जालना : भोकरदन ४६.

विदर्भ :

भंडारा : पवनी ५६.

चंद्रपूर : बल्लारपूर ८२, भद्रावती ५२, चंद्रपूर ५७, चिमूर ६४, गोंडपिंपरी ४१, जेवती ५९, कोरपणा ५६, मूल ३८, पोंबुर्णा ६८, राजापूर ५९, वरोरा ६०.

गडचिरोली : अहेरी १२७, भामरागड ४५, एटापल्ली ७३, सिरोंचा १७१,

गोंदिया : गोंदिया ६८.

नागपूर : हिंगणा ६६, कळमेश्वर ७२, कुही ४३, नरखेड ६५, सावनेर ४८, उमरेड ४१.

वर्धा : खारंघा ५३, समुद्रपूर ८२, सेलू ५७.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com