Gurudutt Sugars Factory : ‘गुरुदत्त’ कडून शेतकऱ्यास एक लाखाची मदत

संभाजीपूर (ता. शिरोळ) येथील ज्ञानेश्वर रामचंद्र पवार यांच्या जबड्याच्या शस्त्रक्रियेसाठी टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील गुरुदत्त शुगर्स कारखान्याचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी एक लाख रुपयांची मदत केली.
Gurudutt Sugars Factory
Gurudutt Sugars FactoryAgrowon

कोल्हापूर : संभाजीपूर (ता. शिरोळ) येथील ज्ञानेश्वर रामचंद्र पवार यांच्या जबड्याच्या शस्त्रक्रियेसाठी टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील गुरुदत्त शुगर्स कारखान्याचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी एक लाख रुपयांची मदत केली.

Gurudutt Sugars Factory
Crop Insurance : आदित्य ठाकरे यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट

श्री. पवार हे शेती करतात शिवाय ते घरचे कर्ते असल्याने शस्त्रक्रियेसाठी मोठी रक्कम आणायची कुठून असा प्रश्न कुटुंबीयांना पडला होता. कोरोनाच्या काळात घरातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली. यावेळीही उपचारासाठी मोठा खर्च झाला होता. कोरोनानंतर म्युकरमायकोसिसची लागण झाली आणि यातच जबड्याची शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचा वैद्यकीय निष्कर्ष पुढे आला.

Gurudutt Sugars Factory
Rabbi Sowing : रब्बी पेरणी का पडतेय लांबणीवर ? | ॲग्रोवन

पवार यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने श्री. घाटगे यांनी त्यांना मदत करावी, अशी विनंती संभाजीपूरमधील सामाजिक कार्यकर्ते राजवर्धन चव्हाण यांनी केली होती. श्री. घाटगे यांनी डॉक्टरांशी संपर्क साधून शस्त्रक्रियेची माहिती घेतली. यानंतर पवार यांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया झाली

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com