मराठवाडा-विदर्भातील पुरग्रस्तांना तत्काळ मदत करा

मराठवाडा आणि विदर्भातील पुरग्रस्तांना कोल्हापूर पुराप्रमाणे तत्काळ मदत म्हणून हेक्टरी रु ४० हजार प्रमाणे तत्काळ मदत जारी करावी, अशी मागणीही या निवदेनात राज्य किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे.
Rajan Kshirsagar
Rajan KshirsagarAgrowon

मराठवाडा-विदर्भातील पुरापरिस्थितीची (Flood) जबाबदारी निश्चित करून दोषीना शासन करावे. त्याचबरोबर पूरग्रस्तांना (Flood Affected) न्याय देण्यासाठी न्यायालयीन चौकशी आयोग नेमावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभा (Kisan Sabha) सरचिटणीस राजन क्षीरसागर (Rajan Kshirsagar) यांनी मुख्यमंत्र्यांना निवदेनाद्वारे केली आहे. या मागणीसाठी १ ऑगस्टपासून महाराष्ट्र राज्य किसान सभा या मागणीसाठी आंदोलन (Protest) करणार असल्याचेही या निवदेनात सांगण्यात आले आहे.

Rajan Kshirsagar
Flood : गडचिरोली वगळता विदर्भात पूर ओसरला

मराठवाडा आणि विदर्भातील पुरग्रस्तांना कोल्हापूर पुराप्रमाणे तत्काळ मदत म्हणून हेक्टरी रु ४० हजार प्रमाणे तत्काळ मदत जारी करावी, अशी मागणीही या निवदेनात राज्य किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे.

२२ जुलै रोजी मराठवाडा-विदर्भातील वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, आणि गोदावरी आणि त्यांच्या उपनद्यांना पूर आला. त्यामुळे या भागात जीवित आणि मालमत्तेची प्रचंड हानी झाली. शेतातील पिकांचे नुकसान झाले. या पुरामुळे सुमारे १०९ हून अधिक व्यक्ती आणि शेकडो जनावरे मृत्यूमुखी पडले. त्यासोबतच थर्मल पॉवर प्रकल्पातील राख शेतात पसरल्याने शेतजमीन नापीक झाली आहे.

Rajan Kshirsagar
Flood : वर्धा नदीच्या पुरामुळे अकरा गावांना पुराचा वेढा

अतिवृष्टीमुळे आलेला पूर हा केवळ नैसर्गिक आपत्ती मानणे चुकीचे आहे. धरण व्यवस्थापन करताना पूरनियंत्रण संबंधी मानदंड निश्चित करून पाळण्यात आले होते काय ? धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग हा खूप मोठ्या प्रमाणावर आणि अनियंत्रित पद्धतीने सोडण्यात आला होता. त्यासाठी कोणतीही पूर्वतयारी आणि पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होते का ? सिंचन कायद्याच्या तरतुदीचे पालन केले का ? असे प्रश्न राजन क्षीरसागर यांनी यानिवेदनात उपस्थित केले आहेत.

त्याचसोबतच विदर्भातील कोळसा खाणी यासाठी मोठ्या प्रमाणावर नदी नाले यांचे नैसर्गिक प्रवाह बदलण्यात आले. त्यामुळे परंपरागत वसलेली गावे धोक्यात आली. सदर प्रवाह बदलताना पर्यावरण आणि वहन क्षमता याचा पुरेसा विचार केला जातो का ? थर्मल पॉवर प्रकल्पातील राख पुराच्या पाण्यात मिसळण्याने आणि दूरवर वाहून जाण्याने झालेले जमिनीचे नुकसान टाळता येण्याजोगे होते किंवा नाही ? राख साठविण्यासाठी योग्य पर्यावरणीय दंडक पाळण्यात आले होते का ? या सर्व बाबी मानवी जीवित हानी आणि मालमत्ता नुकसानीस कारणीभूत असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

या कारणांबद्दल तंत्रवैज्ञानिक मानदंड आणि कायदेशीर तरतुदी यांचे पालन करण्यात कसूरदार कोण आहेत ? कोणाच्या हितसंबंधासाठी हे करण्यात आले ? त्यांना प्रचलित कायद्यांच्या आधारे दंडित करण्यासाठी शासनाने काय करावे ? याच बरोबर नुकसानग्रस्त जनतेस भरपाई देण्यासाठी काय तरतुदी कराव्यात ?

या प्रकारच्या कार्यकक्षेत चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश (उच्च न्यायालय) यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ व्यक्ती यांची चौकशी कमिटी तत्काळ नेमण्यात यावी आणि पूरग्रस्त जनतेस आपली बाजू मांडण्याची देखील संधी द्यावी, अशी मागणी क्षीरसागर यांनी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com