Millet Crop : `बचत गटांच्या माध्यमातून तृणधान्यांचे महत्त्व रुजण्यास मदत`

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे.
Rural News
Rural NewsAgrowon

सोलापूर : संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (International Year of Nutritious Grains) म्हणून घोषित केले आहे. महिला बचत गटांनी तृणधान्यपासून केलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलच्या माध्यमातून तृणधान्य पिकांतील पोषणमूल्ये व त्यांचे मानवी आहारातील महत्त्व जनमानसात पोहोचण्यास व रूजण्यास मदत होईल.

महिला बचत गटांच्या (Women's Savings Group) उत्पादनाचे ब्रँडिग होणे आवश्यक असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून आर्थिक निधीची तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा नियोजन भवन आवारात महिला बचत गटांनी तृणधान्यपासून केलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉलला भेटप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक श्री. मोरे आदी उपस्थित होते.

नियोजन भवन परिसरात गौरी सोहम गृह उद्योग माळीनगर (ता. माळशिरस) (रागी, ज्वारी, बाजरीचे कुकीज), सिद्धशोभा ज्वारी प्रक्रिया युनिट कुंभारी (ता. द. सोलापूर) (ज्वारी रवा, डोसा, इडली), गणेश तानाजी गुंड औंढी (ता.मोहोळ) (ज्वारी कडक भाकरी), शंतनू पाटील बार्शी (ज्वारी पोहे, चिवडा, बिस्किटे, नाचणी बिस्किटे), प्रियदर्शनी महिला बचत गट अक्कलकोट (ज्वारी, बाजरी, नाचणीपासूनचे कुकीज) यांचे स्टॉल लागले आहेत.

Rural News
women Empowerment : महिला बचत गटांचा उद्योजक गट करण्याची गरज

लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण

विखे पाटील यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वितरण करण्यात आले. यामध्ये उत्तम साठे, किसन साठे, अभिजित मनसावले, वैशाली सरवळे यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दत्तात्रेय दोडतले (औज- आहेरवाडी), शशिकला लाळसंगे (मंद्रूप), उत्तर सोलापूरच्या सखूबाई कोकाटे (अकोलेकाटी), प्रियंका लामकाने (अकोलेकाटी), अभिमन्यू विभूते (नान्नज) यांना पूर्व संमती पत्र देण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com