Milk Production: जादा दूध देणाऱ्या कालवडीची पैदास करणे का गरजेचे आहे?

कृत्रिम रेतनाची सुविधा माजावर आलेल्या प्रत्येक जनावरासाठी उपलब्ध झाल्यास अनुवंश विकासाद्वारे उत्पादन क्षमतेत वाढ होईल.
Animal Care
Animal CareAgrowon

Animal Care पुणे : दूध उत्पादन (Milk Production) वाढवायचे असल्यास स्वतःच्या गोठ्यात कालवडी जोपासणे (Heifer Rearing) फार गरजेचे आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता जास्त असणारे व कमी चारा खाऊन जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या कालवडींची पैदास करणे ही काळाची गरज आहे, असे मत एबीएस कंपनीचे विक्री व्यवस्थापक नीलेश लगड यांनी व्यक्त केले.

कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व ग्रामपंचायत मलठण यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड तालुक्यातील मलठण येथे जनावरांमधे उच्च वंशावळीच्या कालवडीची पैदास व उपाययोजना या विषयावरील प्रशिक्षणाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

Animal Care
Animal Care : जनावरांना खारे पाणी दिल्यामुळे काय होतं?

हे प्रशिक्षण प्रकल्प संचालक पूनम खटावकर, तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर यांनी घेतले होते.

या वेळी कृषिमित्र गणेश देवकाते, बापूराव वाघमोडे, बाळासाहेब भोसले, भरत थोरात, नवनाथ थोरात, हरीभाऊ सांगळे, बाबू चव्हाण, गोरख मेंगावडे, डॉ. गौरव कदम आदी उपस्थित होते.

Animal Care
Animal Care : योग्य वेळी गाय आटविण्याचे फायदे काय आहेत?

लगड म्हणाले, की कृत्रिम रेतनाची सुविधा माजावर आलेल्या प्रत्येक जनावरासाठी उपलब्ध झाल्यास अनुवंश विकासाद्वारे उत्पादन क्षमतेत वाढ होईल. योग्य पैदाशीमुळे अनुत्पादक पशुंची संख्या कमी होईल.

दैनंदिन दूध उत्पादनामध्ये गोठ्यात उच्च प्रतीच्या गायींचे प्रमाण कमी झाले आहे. चालू परिस्थितीत दूध उत्पादक चांगल्या गाईंच्या खरेदीसाठी पंजाब, कर्नाटक किंवा इतर राज्यांत जात आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभाऊ सांगळे यांनी केले.

तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर यांनी प्रास्तविक केले. गौरव कदम यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com