Crop Damage: सर्वाधिक वसमत, कळमनुरी तालुक्यात पीक नुकसान

सोयाबीन (Soybean) , कापूस (Cotton), हळद (Turmeric), तूर, मूग, उडीद आदी पिके वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे (Double Sowing) संकट ओढवले.
Crop Damagae
Crop DamagaeAgrowon

हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यातील जून, जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे वसमत, कळमनुरी, हिंगोली या तीन तालुक्यातील ८५ हजार ६०० शेतकऱ्यांच्या ७६ हजार ७७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वसमत, कळमनुरी तालुक्यांमध्ये नुकसानीची व्याप्ती अधिक आहे. शुक्रवार (ता.२२) पर्यंत ४० हजार ७३३ शेतकऱ्यांच्या ३८ हजार २९४ हेक्टरवरील (४९.८८ टक्के) नुकसानीचे पंचनामे झाले अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

अतिवृष्टीमुळे आसना, कयाधू या नद्यांसह, ओढे,नाल्याच्या पुराचे पाणी शेतात शिरल्यामुळे जमिनी खरडून गेल्या आहेत.सोयाबीन (Soybean) , कापूस (Cotton), हळद (Turmeric), तूर, मूग, उडीद आदी पिके वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे (Double Sowing) संकट ओढवले.

ठिबक संचासह सिंचन साहित्य,कृषी अवजारे वाहून गेली.जनावरे दगावल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील अनेक मंडलात काही तासांत १०० ते २०० मिमी पाऊस झाला.त्यामुळे दोन तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान अधिक आहे.

जिल्ह्यातील एकूण ७१ हजार ९४३ हेक्टरवरील जिरायती पिके, ४ हजार ७२३ हेक्टरवरील बागायती पिके, २७ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे.वसमत तालुक्यातील ३७ हजार ५२१ हेक्टरवरील जिरायती पिके,३ हजार ५०० हेक्टरवरील बागायती पिके, २७ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले.

Crop Damagae
Compensation : झारखंडमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत

कळमनुरी तालुक्यातील ३३ हजार ६४२ हेक्टरवरील जिरायती पिके, १ हजार २२३ हेक्टरवरील बागायती पिके,हिंगोली तालुक्यातील ७८० हेक्टरवरील जिरायती पिके, ७८ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.याशिवाय सेनगाव तालुक्यातील अंदाजे २६ हजार ६७८ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केच्या आत नुकसान झाले आहे.

Crop Damagae
Crop Damage : तेलंगणातील शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी

शुक्रवार (ता.२२) पर्यंत वसमत तालुक्यातील ३२ हजार २०० शेतकऱ्यांच्या २८ हजार १०८ हेक्टरवरील जिरायती पिके,२ हजार ३१० हेक्टरवरवरील बागायती पिके,२२ हेक्टरवरील फळपिके असे एकूण ३० हजार ४४० हेक्टर (७४.१६ टक्के) नुकसानीचे पंचनामे झाले होते.कळमनुरी तालुक्यातील ८ हजार १५७ शेतकऱ्यांच्या ७ हजार ५१० हेक्टर जिरायती पिकांचे (२१.५४ टक्के) पंचनामे झाले.हिंगोली तालुक्यातील ३७६ शेतकऱ्यांच्या ३४४ हेक्टरवरील(४०.०९ टक्के) नुकसानीचे पंचनामे झाले होते.

अतिवृष्टी नुकसान स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका...बाधित शेतकरी...बाधित क्षेत्र

वसमत...४६१२०...४१०४८

कळमनुरी...३८५७०...३४८६५

हिंगोली...९१०...८५८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com