Rural Health: ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ पंढरपूरला सुरू

समाजातील सर्वसामान्य नागरिकांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी सांगितले.
Rural Health: ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ पंढरपूरला सुरू

अॅग्रोवन वृत्तसेवा
पंढरपूर, जि. सोलापूर ः जिल्ह्यासह तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागांतील नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ (Hinduhridaysamrat Bal Thackeray Aapla Davakhana) योजना सुरू केली आहे.

समाजातील सर्वसामान्य नागरिकांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी सांगितले.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत ऑनलाईनप्रणालीद्वारे सांगोला नाका (क्लॉक रुम) यमाई तुकाई मंदिराजवळ असणाऱ्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या’चे उद्‍घाटन करण्यात आले.

या वेळी आमदार प्रशांत परिचारक, प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, अप्पर तहसीलदार समाधान घुटूकडे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, उपमुख्य अधिकारी सुनील वाळुंजकर, माजी नगरसेवक वामन बंदपट्टे, डी. राज. सर्वगोड, अनिल सावंत, सोमनाथ आवताडे, महेश साठे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व आरोग्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Rural Health: ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ पंढरपूरला सुरू
Rural Health : ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’पासून ग्रामीण भाग राहणार वंचित

या योजनेद्वारे मोफत उपचार, तपासणी आणि औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ''आपला दवाखान्यात'' बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, मोफत‌ कार्यशाळा तपासणी, टेली कन्सल्टेशन,  गर्भवतींची तपासणी, लसीकरणच्या सेवा देण्यात येणार आहेत.

तसेच या व्यतिरिक्त महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा, योगा व व्यायामबाबतचे प्रात्यक्षिकदेखील करण्यात येणार आहे.

Rural Health: ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ पंढरपूरला सुरू
Eknath Shinde : ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ आता राज्यभर

बाह्यरुग्णसेवेची वेळ दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत असणार आहे. अल्पावधीत सारडा भवनजवळील क्लॉक रूम व जिल्हा परिषद शाळा इसबावी आरोग्य वर्धीनी केंद्र येथे ‘हिंदुहृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ कार्यान्वित होणार असल्याचे डॉ. बोधले यांनी सांगितले.


Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com