Animal Feed : रुई येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांना घरपोच पशुखाद्य

केंद्र सरकारच्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याच्या योजनेमधून इंदापूर तालुका ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना झाली आहे.
Animal Feed
Animal FeedAgrowon

कळस, जि. पुणे ः रुई (ता. इंदापूर) येथील दूध उत्पादक (Dairy Farmer) शेतकऱ्यांना इंदापूर तालुका ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून थेट कंपनी ते शेतकरी असे पशुखाद्य (Animal Feed) घरपोच देण्याचे काम सुरू करण्यात आले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना माफक दरात पशुखाद्य मिळून, दूध उत्पादन खर्चात बचत होत असल्याची माहिती बारामतीच्या अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे (Agriculture Development Trust) डॉ. मिलिंद जोशी यांनी दिली.

Animal Feed
Animal Feed Unit : सुरु करा पशुखाद्य निर्मिती व्यवसाय

केंद्र सरकारच्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याच्या योजनेमधून इंदापूर तालुका ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना झाली आहे. बारामतीचे अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट हे क्लस्टर बेस बिझनेस ऑर्गनायझेशन (सीबीबीओ) म्हणून काम करीत आहे.

Animal Feed
Animal Feed : पशुखाद्याचे दर कमी होण्याचे संकेत

इंदापूर तालुका ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून शेतकरी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांचे ऑनलाइन फॉर्म भरून लाभ मिळवून दिला जात आहे. तसेच सर्व प्रकारचे पशुखाद्य, बी-बियाणे, खते विक्री शेतकरी सुविधा केंद्रामधून करण्यात येते. याचा फायदा सभासद शेतकऱ्यांना मिळत आहे.

पुढील काळामध्ये कंपनीच्या वतीने शेती मालाच्या मूल्यसाखळीमध्ये काम करणार असल्याने, सभासद शेतकऱ्यांना पायाभूत सुविधांचा लाभ घेता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com