Hot Water Pond : उन्हेरेतील गरम पाण्याचे कुंड पर्यटकांनी बहरले

पाली श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनाला आलेले भाविक उन्हेरे कुंडात स्नानासाठी येत असून, स्नान झाल्यानंतर येथील श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आवर्जून येतात.
Tourism
TourismAgrowon

पाली ः पालीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या उन्हेरे गावात गरम पाण्याची कुंडे (Hot Water Pond) आहेत. सध्या थंडी वाढल्‍याने स्थानिक व पर्यटकांची गर्दी (Tourist) होत आहे. सहलीला आलेले विद्यार्थीसुद्धा येथे अंघोळीची आनंद घेतात. त्यामुळे उन्हेरे पर्यटकांनी बहरले आहे.

गंधमिश्रित पाण्याच्या कुंडात स्नान केल्यास त्वचेचे विकार व सांधेदुखी आदी आजार बरे होतात, असे स्‍थानिक सांगतात. पाली श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनाला आलेले भाविक उन्हेरे कुंडात स्नानासाठी येत असून, स्नान झाल्यानंतर येथील श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आवर्जून येतात.

तसेच शाळांच्या सहलीही गरम पाण्याचा आनंद घेऊन येथील नैसर्गिक आविष्‍कार पाहण्यासाठी येत आहेत. या ठिकाणी जेवण, अल्पोपाहार करण्यासाठी हॉटेल तसेच राहण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह असल्‍याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

Tourism
Water Conservation : गरम पाण्याचे कुंड, बारवाचे कोंडिवतेमध्ये संवर्धन

थंड पाण्याचेही कुंड

उन्हेरेत एकूण तीन कुंडे आहेत. त्यातील एक कुंड थंड पाण्याचे आहे; तर उर्वरित दोन कुंडे गरम पाण्याची आहेत. यापैकी थंड पाण्याचे व त्याच्या शेजारी असलेले गरम पाण्याचे कुंड खुले आहे.

तर दुसरे कुंड बंदिस्त असून त्यामध्ये महिला व पुरुषांसाठी दोन स्‍वतंत्र भाग केले आहेत. उन्हेरेतील गरम पाण्याच्या कुंडात स्नान केल्यास ताजेतवाने वाटते.

त्यामुळे दिवसभर मोलमजुरी करून आलेले कामगार, शेतकरी व स्थानिक संध्याकाळी येथून स्नान केल्याशिवाय घरी जात नाहीत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com