Weather Update : उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज

राज्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असतानाच उन्हाचा चटका आणि उकाड्यातही चांगलीच वाढ झाली आहे.
Weather UPdate
Weather UPdateAgrowon

पुणे : राज्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने (Rainfall With strong winds) हजेरी लावली असतानाच उन्हाचा चटका (Temperature) आणि उकाड्यातही (Heat) चांगलीच वाढ झाली आहे. आज (ता. ४) विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast With Lighting) आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

Weather UPdate
Weather Update : मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे सरकले आहे. तर पूर्वेकडील टोक गोरखपूर, मुजप्फराबाद, जलपैगुरी नागालॅण्ड ते आसामपर्यंत विस्तारले आहे. लक्षद्वीप बेटे आणि लगतच्या अरबी समुद्रात ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या चक्राकार वाऱ्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.

दोन, तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसानंतर राज्याच्या अनेक भागात पावसाने पुन्हा उघडीप दिली आहे. उघडीप दिलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. उन्हामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. आज (ता. ४) विदर्भासह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

मध्य महाराष्ट्र : सांगली, कोल्हापूर.

विदर्भ : अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा,

गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com