Corn Rate : मक्याचे दर कसे आहेत ?

केंद्र सरकारने यंदाच्या खरिपात मका उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा ५ लाख टनांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र मका पिकाला सुरुवातीपासूनच पावसाचा फटका बसला.
corn Rate
corn RateAgrowon

पुणेः केंद्र सरकारने यंदाच्या खरिपात (Kharip Season) मका उत्पादन (Corn Production) गेल्यावर्षीपेक्षा ५ लाख टनांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र मका पिकाला सुरुवातीपासूनच पावसाचा (Heavy Rainfall)फटका बसला. त्यामुळे उत्पादन कमीच राहील, असं शेतकरी आणि जाणकार सांगत आहेत. राज्यातील काही बाजारांमध्ये आता नव्या मक्याची आवक सुरु झाली. मात्र दर दबावात आहेत.

देशात दरवर्षी २८० ते ३०० लाख टनांच्या दरम्यान मक्याचे उत्पादन होते. मात्र मागील हंगामात, म्हणजेच २०२१-२२ मध्ये मक्याचे विक्रमी उत्पादन झाले होते. मागील हंगामात खरिप आणि रब्बी या दोन्ही हंगामात ३३६ लाख टन उत्पादन झाले होते. त्यापैकी खरिपात २२६ लाख टन उत्पादन झाले होते. तर रब्बी हंगामात १०९ लाख टन मका मिळाला. मागील हंगामात पावसाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे उत्पादन वाढल्याचे सरकारने सांगितले.

corn Rate
Indian Agriculture : गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पदासाठी फुटले भाव

यंदाही केंद्र सरकारने खरिपात २३१ लाख टन मका उत्पादन होईल, असा अंदाज केंद्र सरकारने जाहीर केला. तर मागील हंगामात २२६ लाख टन मका उत्पादन झाले होते. म्हणजेच यंदाच्या खरिपातील मका उत्पादन ५ लाख टनांनी वाढणार असल्याचा अंदाज सरकारने जाहीर केला.

पण यंदाच्या खरिपात सुरुवातीपासूनच मका पिकावर पावसाचा परिणाम होत राहीला. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने मका पिकाचे नुकसान झाले. ऑक्टोबर महिन्यात मका उत्पादनक पट्ट्यात जोरदार पाऊस झाले. सतत ढगाळ वातारण होते. त्यामुळे कीड-रोगाचाही परिणाम झाला. त्यामुळे केंद्र सरकार पुढील अंदाज उत्पादन कमी करू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

सध्या राज्यात काही बाजार समित्यांमध्ये आता नवा मका विक्रीसाठी येतोय. मात्र नव्या मालामध्ये ओलावा जास्त असल्याने दर हमीभावापेक्षा कमी मिळत आहेत. सध्या नव्या मक्याला प्रतिक्विंटल १ हजार ६०० ते १ हजार ९०० रुपये दर मिळतोय. तर जुना मका १ हजार ९०० रुपयांपासून २ हजार ३०० रुपयांपर्यंत विकला जातोय. पुढील महिनाभरात बाजारांमध्ये मका आवक वाढेल. या काळात मक्याला सरासरी २ हजार ते २ हजार २०० रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज मका व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com