Agriculture Technology : गवत नियंत्रण करणार मशिन कसं काम करतं ? शेतकऱ्यांना होणार फायदा ?

शेतातील गवत नियंत्रणासाठी कित्येक उपाय करूनही गवत नियंत्रण होत नाही. त्यात शेत मजुरीचा खर्च वाढला आहे.
Agriculture Technology
Agriculture Technology Agrowon

नाशिक येथे २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान कृषीथॉन कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे (Agriculture Technology) प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. त्यामधील गवत नियंत्रण मशिन आणि पोर्टेबल काउ लिफ्टची माहीती आपण घेणार आहोत. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे त्याबद्दल जाणून घेऊ.

शेतातील गवत नियंत्रणासाठी कित्येक उपाय करूनही गवत नियंत्रण होत नाही. त्यात शेत मजुरीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे तणनाशक फवारणी करून अनेक शेतकरी गवत नियंत्रण करतात. मात्र फळबागांसाठी आता गवत नियंत्रण करणारे मशिन विकसित करण्यात आले आहे. स्पेनचे असलेल्या या तंत्रज्ञानाला पुढच्या वर्षभरात भारतात इम्पोर्ट केले जाणार आहे. त्यामुळे फळबाग शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे.

अधिक माहितीसाथी खाली दिलेला व्हिडिओ पाहू शकता.

तंत्रज्ञानाचे फायदे-

साधारणत एक तासात दीड दोन एकर शेतातील गवताचा बारीक भुगा या मशिनद्वारे करता येतो. एका दिवसामध्ये 15 ते 20 एकर जमिनीवरील गवताचा बारीक भुगा करू शकते.

विशेषतः झाडापासून तीन ते चार इंच अंतर राखून उभ्या फळभागेत गवत नियंत्रण करता येते. यातून फळझाडांचे नुकसान होत नाही.

कमीत कमी 24 एचपीच्या ट्रॅक्टरसाठी ही तंत्रज्ञान विकसित करण्यात आले.

मनुष्यबळाचा खर्च वाचतो. सात ते आठ वर्षे मशिनवर कुठलाही खर्च करावा लागत नाही.

Agriculture Technology
Senser Technology : अत्याधुनिक सेन्सर तंत्रज्ञानाद्वारे अचूक शेतीला मदत

काय काळजी घ्यावी लागते ?

वेळेच्या वेळेला मशिनमधील ऑइल बदलावे लागते. त्यानंतर पाते बदलावे लागतात. फळबागेतील दोन ओळीतील अंतर 7 ते 15 फुटापर्यंत असावे लागते.दोन झाडातील अंतरानुसार मशिन अॅडेजस्ट करता येते.

पोर्टेबल काउ लिफ्ट-

पशुपालकांकडील पशु अनेकदा आजारी पडतात. अशावेळी पशुपालकाला आजारी जनावर डॉक्टरांकडे घेऊन जाता येत नाही. त्यामुळे पशुपालकांची अडचण होते. मात्र आयआयटी मुंबईच्य मदतीने काउ लिफ्ट विकसित करण्यात आली आहे. यामध्ये जनावराला ठेवून जनावर पशुवैद्यकाकडे घेऊन जाता येते. त्यामुळे पशुपालकांची कटकट आता कमी होणार आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पाहू शकता.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com