
HSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. मार्च-एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा प्रत्यक्ष निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. त्यापूर्वी बोर्डाकडून पत्रकार परिषद घेत राज्याचा बारावीचा विभाग निहाय निकाल जाहीर केला आहे. यंदाचा राज्याचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे.
यंदाचा बारावीचा निकाल बोर्डाने जाहीर केला असला, तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजता ऑनलाईन पध्दतीने निकाल पाहता येणार आहे. बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात.
बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा राज्याचा संपूर्ण निकाल हा ९१.२५ टक्के इतका लागला आहे. यंदाच्या वर्षी कोकण विभागाने निकालात बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल ९६.०१ टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा आहे. मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के निकाल आहे. तर दिव्यांग श्रेणीतील ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
यंदाही निकालात मुलींची बाजी
राज्यात यंदा १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. यापैकी १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही निकालामध्ये मुलींनी बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.७३ टक्के आहे. तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.१४ टक्के आहे. मुलांपेक्षा मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ४.५९ टक्के इतके जास्त आहे.
गुण पडताळणीसाठी २६ मे पासून अर्ज करता येणार
ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांच्या गुणांची पडताळणी करता येणार आहे. यासाठी उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत, पुनर्मुल्यांकनासाठी संबंधित विभागाच्या मंडळाकडे ऑनलाईन पाठवता येणार आहे. http://verification.mhehsc.ac.in या संकेतस्थळावरून विद्यार्थी स्वत: किंवा महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विभाग निहाय निकाल
पुणे - ९३.३४ टक्के
नागपूर - ९०.३५ टक्के
छ. संभाजीनगर - ९१.८५ टक्के
मुंबई - ८८.१३ टक्के
कोल्हापूर - ९३.२८ टक्के
अमरावती - ९२.७५ टक्के
नाशिक - ९१.६६ टक्के
लातूर - ९०.३७ टक्के
कोकण - ९६.०१ टक्के
या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल
mahresult.nic.in
http://hsc.mahresult.org.in
https://hscresult.mkcl.org
असा पाहा निकाल
ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
HSC परीक्षेच्या निकालाच्या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचा रोल नंबर येथे टाका.
आता निकाल स्क्रीनवर दिसेल.
त्यानंतर निकाल डाउनलोड करा.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.