Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूटवरील कार्यशाळेस शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथे राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापण संस्थेत ‘ड्रॅगन फ्रूटची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान’ या विषयावर पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा झाली.
Dragon Fruit
Dragon FruitAgrowon

Dragon Fruit Farming माळेगाव ः माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथे राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापण संस्थेत ‘ड्रॅगन फ्रूटची उत्पादकता (Dragon Fruit) आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान’ (Agriculture Technology) या विषयावर पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा झाली. त्यास शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.

या कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे आणि ‘महा ड्रॅगन फ्रूट’ पुणे यांनी केले.

नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन विभागाचे (नवी दिल्ली) उपमहानिदेशक डॉ. सुरेश कुमार चौधरी, व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास मोटे, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापण संस्था बारामतीचे संचालक डॉ. के. सम्मी रेड्डी, सिजेंटा फाउंडेशन इंडियाचे डॉ. गजानन राजूरकर उपस्थित होते.

Dragon Fruit
Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूट ला आरोग्यदायी का मानले जाते?

डॉ. मोटे यांनी निर्यातीत, विशेषतः फळ पिकांमध्ये यश मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असे सांगितले.

पहिल्या तांत्रिक सत्रात उत्पादन तंत्रज्ञान, फुलांच्या आणि परागीकरणाच्या समस्या, पीक संरक्षण, काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि ड्रॅगन फळांच्या लागवडीतील मूल्यवर्धन, तर दुसऱ्या सत्रात राज्य विभागाच्या विविध योजनांचे महत्त्व, ड्रॅगन फ्रूटच्या निर्यातीच्या संधी यावर प्रकाश टाकण्यात आला.

Dragon Fruit
Dragon Fruit Farming : ‘ड्रॅगन फ्रूट’मध्ये मिळवला बारा वर्षांचा तगडा अनुभव

तिसऱ्या सत्रात डॉ. प्रमोद भगत, महेश आजबे, प्रियांका तावरे, दयानंद खरात या प्रगतिशील ड्रॅगन फळ शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी फळांच्या लागवडीतील आव्हाने आणि संधींबद्दल त्यांचे अनुभव सांगितले. डॉ. विजयसिंह काकडे, डॉ. संग्राम चव्हाण, डॉ. वनिता साळुंखे, डॉ. बोरइय्या, डॉ. एलिझा प्रधान आदींनी परिश्रम घेतले.

कल्पना आणि अनुभवांची देवाणघेवाण

या कार्यशाळेत पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील ४०० पेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले. विविध संशोधन, विकास आणि खासगी संस्थांनी आयोजनासाठी मदत केली. या कार्यशाळेतून कल्पना आणि अनुभवांची देवाणघेवाण करता आली.

पाण्याची कमतरता असलेल्या आणि खराब भागात ड्रॅगन फळाची उत्पादकता, गुणवत्ता वाढविण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानाबद्दल ज्ञान प्राप्त करण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com