मानवी मुखवटे थोपवणार मानव-वन्यजीव संघर्ष

चंद्रपूर जिल्ह्यात मानवी-वन्यजीव संघर्ष अधिक आहे. २०२१ मध्ये ४४ व्यक्‍तींचा अशा घटनांमध्ये मृत्यू झाला. तेंदूपत्ता, चराई, शेती कामे अशा विविध कारणांसाठी जंगलालगत राहणारे रहिवासी राखीव क्षेत्रात जातात.
Crop Protection
Crop ProtectionAgrowon

नागपूर ः चंद्रपूर जिल्ह्यात मानवी-वन्यजीव संघर्ष (Human Wild Life Conflict) नियंत्रणासाठी आता अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत जंगलाशी सातत्याने संपर्क येणाऱ्यांना मानवी मुखवटे (Human Mask) देण्यात येतील. ते चेहऱ्याच्या मागील बाजूस लावण्यात येतील. त्याद्वारे व्यक्तीची नजर मागील बाजूने असल्याचे भासेल. वन्य प्राण्यांचे हल्ले (Wild Life Attack) थोपविण्यात ही युक्ती नामी ठरेल, असा आशावाद हा उपक्रम राबविणाऱ्या बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीने (Bombay Natural History Society) व्यक्त केला आहे. या पुढील काळात संस्था याचे परिणामही अभ्यासेल.

Crop Protection
Crop Protection : खोडमाशीसह अळ्यांना रोखा

चंद्रपूर जिल्ह्यात मानवी-वन्यजीव संघर्ष अधिक आहे. २०२१ मध्ये ४४ व्यक्‍तींचा अशा घटनांमध्ये मृत्यू झाला. तेंदूपत्ता, चराई, शेती कामे अशा विविध कारणांसाठी जंगलालगत राहणारे रहिवासी राखीव क्षेत्रात जातात. त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ल्याचे प्रकार घडतात. १५०० पेक्षा अधिक गावे जंगलाच्या काठावर आहेत. या परिसरात धान, सोयाबीनसारखी पिके घेतली जातात. गावातील गायरान जमिनी वहितीखाली आल्या. त्यामुळे गावातील गुरांच्या चराईचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यातून त्यांना जंगलात नेण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यांच्यावरच अधिक प्रमाणात हिंस्र प्राण्यांकडून हल्ले होतात.

Crop Protection
Crop Insurance : पीक नुकसानीबाबत विमा कंपनीकडे शेतकऱ्यांचे हजारो दावे

आकडेवारीनुसार, १५ ते १८ गुराख्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीने मानवी-वन्यजीव संघर्ष कमी होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात गुराखी संवाद कार्यक्रम राबविण्यात आला. मूल तालुक्‍यात मे-जून महिन्यात चार घटनांमध्ये गुराखी मृत्युमुखी पडले होते. त्याच तालुक्‍यापासून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यावर संस्थेने भर दिला. जंगलाशी सर्वाधिक संपर्क येणारे गुराखी, शेतकरी आदी घटकांना या उपक्रमात सहभागी करून घेतले. मानवी मुखवटे त्यांच्या चेहऱ्याच्या मागील बाजूस लावण्यात येतील. त्यावरुन वन्यप्राण्याला वाटेल की संबंधित व्यक्‍ती आपल्याकडेच पाहतो आहे. परिणामी, तो हल्ला करण्यास धजावणार नाही, असे यात अपेक्षित आहे.

सुंदरबन (पश्‍चिम बंगाल) मध्ये असा प्रयोग करण्यात आला. संस्थेने राज्यात सर्वाधिक मानवी-वन्यजीव संघर्ष असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात ९८, तर दुसऱ्या टप्प्यात १४० फायबर मुखवटे वितरित करण्यात आले. या भागातील वनक्षेत्रालगत सुमारे ३५० गुराखी आहेत. हा प्रयोग असून त्याचे परिणाम अभ्यासण्यात येतील.

- संजय करकरे, सहाय्यक संचालक,

बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com