
Akole Student Health News : आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत पैठण (ता. अकोले) येथील आश्रमशाळेत सुमारे दीडशे विद्यार्थिनी थंडी-तापाने आजारी पडल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे.
या विद्यार्थिनींवर संगमनेर व लोणी येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आश्रमशाळेस सुटी जाहीर केली आहे.
पैठण येथे मुलींची आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत आदिवासी समाजातील चारशे विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. त्यासाठी येथे ३२ शिक्षक-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी टप्प्याटप्प्याने दीडशे विद्यार्थिनी थंडी, ताप, उलट्या-जुलाबाने आजारी पडल्या.
त्यांना मुख्याध्यापक व शिक्षकांनी तातडीने कोतूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र काही विद्यार्थिनींची तब्येत खालावल्याने त्यांना लोणी, संगमनेर येथे हलविण्यात आले. त्यामुळे प्रशासन व पालकांची एकच धावपळ उडाली.
ज्या विद्यार्थिनींची तब्येत सुधारली आहे, अशा विद्यार्थिनी आपल्या घरी गेल्या आहेत. काही विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थिनी आजारी पडल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
अधीक्षकाची जागा रिक्त
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय समितीचे या आश्रमशाळेकडे दुर्लक्ष होत आहे. शाळेत स्त्री अधीक्षक नसून, तातडीने ही रिक्त जागा भरावी, असे तत्कालीन प्रकल्प अधिकारी व प्रकल्प समितीला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.