Sugarcane Rate : खोडवा उसासाठी‘भीमाशंकर’कडून शंभर रुपये वाढीव दर

आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रेयनगर, पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामासाठी (२०२३-२४) गाळपास येणाऱ्या खोडवा उसासाठी १०० रुपये प्रती टन वाढीव दर देण्याचा निर्णय घेतला आहे.
Sugarcane
Sugarcane Agrowon

मंचर : आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रेयनगर, पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने (Bhimashankar Sugar Facory) चालू हंगामासाठी (२०२३-२४) गाळपास येणाऱ्या खोडवा उसासाठी (Khodva Sugarcane) १०० रुपये प्रती टन वाढीव दर देण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच पाचट कुट्टी व जीवाणू खते वाटप अनुदान योजना कार्यक्षेत्र व परिसरासाठी जाहीर केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

Sugarcane
Sugarcane FRP : ‘एफआरपी’बाबतचे गोड गैरसमज

श्री. बेंडे म्हणाले, की कारखान्याचे संस्थापक व राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या चालू गाळप हंगामामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत हेक्टरी २० ते २५ टन उत्पादन घटलेले आहे.

तसेच अतिवृष्टीमुळे ऊस लागवड क्षेत्र कमी झाले आहे. खोडवा ऊस गळीतास आल्यानंतर १०० रुपये प्रती टन वाढीव देण्यात येईल. मजुरांकडून तोडणी केलेल्या उसाचे पाचट कुट्टी कारखान्यांमार्फत १०० टक्के अनुदानावर केली जाणार असून, तसेच ५० टक्के अनुदानावर कारखान्याकडून उत्पादित जीवाणू खतांचे वाटप केले जाणार आहे.

Sugarcane
Sugarcane FRP : राज्यातील १२२ कारखान्यांनी ‘एफआरपी’ थकविली

पुढील वर्षी गाळपासाठी ऊस उपलब्धता होण्यासाठी व खोडवा उसाचे पाचट न जाळता पाचट कुट्टी केली जाणे आवश्यक आहे. पाचट आच्छादनामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढते, पाण्याची बचत होते, जमिनीत हवा खेळती राहते, उपयुक्त जिवाणूंची वाढ होते, खुरपणी-आंतरमशागत खर्च वाचतो, यामुळे हेक्टरी १५ ते २० टन उत्पादनात वाढ होते.

त्याबरोबर जिवाणू खतांचा वापर केल्यामुळे जमिनीच्या जैविक सुपीकतेत वाढ होऊन रासायनिक खतांची उपलब्धता वाढते. कार्यक्षेत्र व परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुटलेल्या उसाचा खोडवा राखून वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com