खारपाण पट्ट्यातील शेकडो एकर जमीन पाण्याखाली

आधीच खारपाण पट्ट्याचा शाप लागलेल्या भागात यंदा सर्वाधिक पाऊस झाल्याने शेतशिवारात केवळ पाणीच साचलेले दिसत आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

अकोला ः आधीच खारपाण पट्ट्याचा (Salty Soil Belt) शाप लागलेल्या भागात यंदा सर्वाधिक पाऊस (Rainfall) झाल्याने शेतशिवारात केवळ पाणीच साचलेले (Water Logging in Farm) दिसत आहे. अकोट तालुक्यातील धारेल ते केळीवेळी या पट्ट्यात शेकडो एकरातील शेती पाण्याखाली असून पिके जागेवरच वाळत (Crop Damage) चालल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

Heavy Rain
खारपाण पट्ट्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर 

अकोला जिल्ह्यात पूर्णा खोऱ्यात खारपाण पट्टा पसरलेला आहे. जास्त पाऊस झाल्यास या जमिनी जिभडतात. यंदा या भागात आजवरचा सर्वाधिक पाऊस झाल्याचे जाणकार सांगत आहेत. सततच्या पावसामुळे सखल भागातील शेतांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचलेले आहे. जमिनीवर शेवाळ तयार झाले आहे. या जमिनीत आधीच पाण्याचा निचरा होत नसल्याने व अधिक पाऊस झाल्याने संकट तयार झालेले आहे.

Heavy Rain
खारपाण पट्ट्यातील कर्मचाऱ्यांना ‘पोकरा’ देणार शून्य मशागतीचे तंत्र

या भागात कपाशीचा सर्वाधिक पेरा झालेला आहे. शेतांमध्ये पाणी साचलेले असल्याने अनेक ठिकाणी कपाशीची झाडे दिसत नाहीत. सध्या पाऊस बंद झाला तरीही या भागात किमान पुढील १५ ते २० दिवस कुठलेही काम होऊ शकत नाही, इतके पाणी साचलेले आहे. या पाण्याचा निचराच पूर्णपणे बंद झालेला आहे. धारेल ते केळीवेळी दरम्यान शेकडो एकर अशी शेती पाण्यात आहे.

वन्यजिवांचाही त्रास

सखल भागातील शेती पाण्यात असताना उताराच्या शेतांमधील पिकांना रानडुकरांचा त्रास आहे. प्रामुख्याने मूग, उडदाच्या पिकाला हे वन्यजीव फस्त करून टाकत आहेत. राखण करूनही पीक वाचवणे आता शेतकऱ्यांच्या हातात राहिलेले नाही.

आमच्या भागातील काही शेतांमध्ये दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचलेले आहे. आता या शेतकऱ्यांना रब्बीची पेरणी करावी, लागेल अशी स्थिती आहे. त्यातही यापुढील काळात आणखी पाऊस झाला तर स्थिती आणखीच बिकट बनू शकते.आधीच शेतकऱ्यांजवळील पैसा बी-बियाणे, खत, पेरणी, मशागतीला लावून बसलेला आहे. आता रब्बीच्या पेरणीसाठी पैशांचे संकट उभे ठाकू शकते. शेतकऱ्यांना पाठबळाची गरज आहे.

-विनोद पाटील, सरपंच, धारेल, ता. अकोट, जि. अकोला

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com