Crop Insurance : पीक विमा नाकारणारी ICICI लोम्बार्ड कंपनी काळ्या यादीत, अकोला जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव

ICICI Lombard Black Listed : संततधार पाऊस, अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, पीक विमा कंपनी पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.
neema arora
neema aroraagrowon

Akola Crop Insurance Update: राज्यात यंदा झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. कापूस, सोयाबीन, तूर, गहू आदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या. नैसर्गिक संकट पाहता अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. मात्र, अद्यापही विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पुरेशी नुकसान भरपाई मिळालेली नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांना विमा लाभापासून वंचित ठेवल्याप्रकरणी आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीस काळ्या यादीत टाकण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.

neema arora
Crop Insurance Digi Claim : पीकविमा योजनेत येणार पार्दशकता ; केंद्र सरकारकडून डिजिक्लेम सुविधा लाँच

अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी, परतीच्या पावसाने शेतीपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, पीक विमा कंपनीकडून अद्याप शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत मिळालेली नाही. ऑनलाइन, ऑफलाइन अर्ज संख्या मोठी असली तरी उशिरा अर्ज आल्याचे सांगून लाखो शेतकऱ्यांचे अर्ज कंपन्यांनी नाकारल्याचे सांगण्यात येते.

neema arora
Crop Loan Recovery : शेतकऱ्याची जमाठेव पीककर्जात केली वळती

जिल्ह्यात पीक विमा काढण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आयसीआय लोम्बार्ड या विमा कंपनीने कामात दिरंगाई केली व शेतकऱ्यांना विमा लाभापासून वंचित ठेवल्याप्रकरणी या कंपनीस काळ्या यादीत टाकण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली. दरम्यान अद्यापही शेतकऱ्यांचे विमा दावे प्रलंबित असल्यास हे दावे दि.५ जून पर्यंत स्विकारण्यात येतील असेही कळविण्यात आले आहे.

पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक आपत्ती पोटी देण्यात आलेले विमा भरपाई मोबदला देण्यासाठी करावयाची प्राथमिक चौकशी, झालेल्या नुकसानीचे पंचनामे, शेतकऱ्यांचे पीक विमा दावे काढण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड या कंपनीची शासनातर्फे नियुक्ती झाली होती. पण, शेतकऱ्यांना प्रतिसाद न देणे, दिरंगाई करणे, मनुष्यबळाची उपलब्धता नसणे, अशा कारणास्तव जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी या कंपनीस काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी शिफारस शासनाकडे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com