Sahyadri Farms : प्रत्येक जिल्ह्यात ‘सह्याद्री’सारखा प्रकल्प उभा राहिल्यास देश अव्वल

प्रत्येक जिल्ह्यात ‘सह्याद्री’सारखा प्रकल्प उभा राहिल्यास देश जगात एक नंबर होईल, असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते, महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.
Sahyadr Farms
Sahyadr Farms Agrowon

Nashik News नाशिक : ‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी’सारखा (Sahyadri Farms) आदर्श प्रकल्प पाहिल्यानंतर नेमके काय मार्गदर्शन करावे हा प्रश्न माझ्यासमोर आहे. मी मार्गदर्शन करण्यासाठी नव्हे, तर मार्गदर्शन घेण्यासाठी आलो आहे.

येथे शेतकरी संघटित होऊन एक चमत्कार करू शकतो हे ‘सह्याद्री’सारख्या प्रयोगातून दिसून येते. शेतकरी स्वतःचा शेतमाल निर्यात (Agriculture Export) करतात व अपेक्षित दरही मिळवतात हे शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

प्रत्येक जिल्ह्यात ‘सह्याद्री’सारखा प्रकल्प उभा राहिल्यास देश जगात एक नंबर होईल, असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते, महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काढले.

सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने शनिवारी (ता. १८) बायोगॅस ऊर्जा प्रकल्पाचे उद्‌घाटन मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजित फलोत्पादक शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.

व्यासपीठावर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील, महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, सह्याद्रीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे उपस्थित होते.

Sahyadr Farms
Sahyadri Farms : ‘सह्याद्री’ खरेदी करणार पंढरपुरातील बेदाणा

पुढे गडकरी म्हणाले, की विदर्भात २२ साखर कारखान्यांचे दिवाळे निघाले आहे. शेतकरी आत्महत्या होऊ नये त्यासाठी भावनात्मक निर्णय घेऊन साखर कारखानदारी सुरू केली.गेल्या १५ वर्षांनंतर आम्ही यंदा नफ्यात आलो आहोत. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर अभ्यास करून विदर्भात लक्षणीय सुधारणा झाली आहे. शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण मिळाल्यामुळे हे शक्य झाले.

झिरवाळ म्हणाले, की नोकरीच्या मागे न लागता जिद्दीने शेती करणारे तरुण शेतकरी ही या भागाची ओळख आहे. अवकाळी पावसाने शेती जशी अडचणीत आली आहे. तशी शेतमजूरही अडचणीत आले आहेत. त्यांच्या निवाऱ्याबाबत व्यवस्था करावी, अशी सूचना मांडली.

गडकरी यांनी सह्याद्री फार्मर्स येथे भेट देऊन द्राक्षांच्या विविध जाती, प्रक्रिया, विपणन, शेतमाल निर्यात आदी बाबींची पाहणी केली. विलास शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभा केलेला ‘सह्याद्री फार्म’ पॅटर्न हा शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक आहे. येणाऱ्या काळात यशस्वी होण्यासाठी शेतकऱ्यांनी जगातीले यशस्वी प्रयोग स्वीकारणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

एच-स्क्वेअर इनक्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद राजेभोसले यांनी सूत्रसंचालन केले. सह्याद्री फार्मर्स सस्टेनेबल ग्रासरुट इनिशिएटिव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित काळे यांनी आभार मानले.

Sahyadr Farms
Sahyadri Farms : नशीब स्वत:चे घडवित नेई ‘कर्ता शेतकरी’

ज्येष्ठ द्राक्ष उत्पादकांचा कृतज्ञ सन्मान

राज्यभरात द्राक्षशेती रुजविण्यात तसेच द्राक्ष उद्योग उभा राहण्यात अनेक जिद्दी द्राक्ष उत्पादकांनी अहोरात्र कष्ट घेतले.

त्यातील काही ज्येष्ठ प्रयोगशील द्राक्ष उत्पादकांचा या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते कृतज्ञ सन्मान हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

श्रीराम ढोकरे, डी. बी. मोगल, जगन्नाथ खापरे, अशोक गायकवाड, माणिकराव पाटील, वासुदेव काठे, राजेंद्र ब्रम्हेचा, अरुण मोरे यांचा सन्मान या वेळी झाला.

पिकापेक्षा पैशाकडे अधिक लक्ष द्या

आता गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरीत फार पैसा नाही. पर्यायी इंधनातच आता पैसा मिळविण्याच्या संधी जास्त आहेत. येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना सह्याद्रीच्या माध्यमातून पुढील २५ वर्षांच्या विकासाचे व्हीजन मिळावे. त्यादृष्टीने पीकनिहाय नियोजन केले तर फार मोठा बदल होईल. पिकापेक्षा पैशाकडे अधिक लक्ष द्या, असा सल्ला गडकरी यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com