Kalamana APMC : शेतकऱ्यांकडून बेकायदा आडत वसूली?

नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून बेकायदा आडत वसूल केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
Kalamana APMC : शेतकऱ्यांकडून बेकायदा आडत वसूली?

Kalamana APMC News नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून बेकायदा आडत वसूल (Adat Recovery) केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

शेतकऱ्यांकडून बेकायदेशीररित्या सहा टक्के आडत वसूल केली जात आहे. शेतकऱ्यांची लूट होत असताना बाजार समिती प्रशासन (APMC Administration) मात्र गप्प असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

कळमना बाजर समितीमध्ये परिसारातील शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी आणत असतात. बाजर समितीमध्ये शेतकऱ्यांकडून आडत बंद केलेली आहे. असे असले तरी व्यापाऱ्यांकडून आडत वसूल केली जात असल्याचे समोर आले आहे.

Kalamana APMC : शेतकऱ्यांकडून बेकायदा आडत वसूली?
Mumbai APMC : अपात्र संचालकांची सुनावणी १८ जुलै रोजी होणार

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पावतीवर अधिकचा खर्च अशी नोंद करून बेकायदेशीर वसूली केली जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या शेतीमालावर प्रत्येक शेतकऱ्याकडून सहा टक्के दलाली वसूल केली जात असल्याचे शेतकरी सांगत आहे. पावतीवर आडत ऐवजी अधिकचा खर्च अशी नोंद केली जात आहे.

Kalamana APMC : शेतकऱ्यांकडून बेकायदा आडत वसूली?
Kalamana APMC : कळमना बाजारातील लुटीविरोधात ‘झेडपी’चा ठराव

त्यामुळे तक्रारही करता येत नाही. सरकारचे नियंत्रण नसल्याने व्यापारी दलाली कापत आहेत. दलालीच्या नावावर प्रत्येक शेतकऱ्याची बाजार समितीत लूट होत आहे, असा आरोपही शेतकरी करत आहेत.

शेतमालाच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून आडतीच्या नावाखाली पैसे वसूल होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तक्रार करण्यासाठी कोणत्या आमदराला, खासदाराल आणयचे. या संदर्भात आम्ही कोणाकडे तक्रार करावी, अशी हतबलता शेतकरी व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com