IMD Rain Prediction: राज्यात तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. आजपासून (ता. १५) राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Rain Prediction
Rain PredictionAgrowon

Weather Update राज्यात पुढील तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज Rain Forecast) हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवला आहे.

तसेच विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि गारपीटीचा (Hailstorm) इशारा देण्यात आला आहे.

राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. आजपासून (ता. १५) राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा, द्राक्ष आदी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हरभरा हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. विदर्भ, मराठवाड्यातील लाखो शेतकरी या पिकावर अवलंबून आहेत. यंदा राज्यात हरभऱ्याचे लागवड क्षेत्र ५ लाख हेक्टरने वाढले आहे.

त्यामुळे हरभरा उत्पादनात १० लाख टन वाढ होण्याचा अंदाज आहे, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कालच (ता. १४) विधानसभेत सांगितले होते.

Rain Prediction
Weather Update : कोकणात आज उष्ण लाटेचा इशारा

परंतु अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच उतारा घटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हरभरा उत्पादन वाढीचा अंदाज फसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी गहू, कडधान्य आणि द्राक्ष पिकांची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी ते ठेवावेत, असा सल्ला हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

Rain Prediction
Weather update : राज्यात पुन्हा पावसाची शक्यता...

केळीच्या घडांना बांबूच्या काठ्यांनी आधार द्यावा, तसेच मध्य महाराष्ट्रात द्राक्षांचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी स्कर्टिंग बॅग्ज किंवा अॅल्युमिनियम कोटेड पेपरचा वापर करावा, असा सल्ला हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

कर्नाटक ते कोकणापर्यंत समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. झारखंड ते तेलंगणा दरम्यान आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

तसेच राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यातच बंगालच्या उपसागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टा यांच्या एकत्र प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण झाले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com