Soybean Harvesting : पावसामुळे सोयाबीन कापणीवर परिणाम

शिल्लक राहिलेल्या सोयाबीन पिकांची कापणी सुरु असताना मागील तीन दिवसापासून पाऊस होत आहे. या पावसामुळे संकटाची मालिका सुरु असलेल्या शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.
Soybean Harvesting
Soybean HarvestingAgrowon

नांदेड : जिल्ह्यात पावसाचा खंड, यानंतर झालेल्या अतिवृष्टीने (Heavy Rain) लाखो हेक्टरवरील पिकांचा घास घेतला (Crop Damage). यानंतर शिल्लक राहिलेल्या सोयाबीन पिकांची कापणी (Soybean Harvesting) सुरु असताना मागील तीन दिवसापासून पाऊस होत आहे. या पावसामुळे संकटाची मालिका सुरु असलेल्या शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. कापलेले सोयाबीन भिजू नये यासाठी ते झाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.

Soybean Harvesting
Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यात दाणादाण

जिल्ह्यात जूनमध्ये खरिपांच्या पेरण्या झाल्यानंतर जुलैमध्ये तुफान पर्जन्यवृष्टी झाली. या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन सखल तसेच नाल्याकाठच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात पाच लाख १८ हजार हेक्टरवरील जिरायती, बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले.

Soybean Harvesting
Soybean Rate : हंगामाच्या सुरुवातीलाच सोयाबीनच्या दरात घसरण

या नैसर्गिक आपत्तीचा फटका सात लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना बसला. यंदा शेतकऱ्यांना सतत संकटाचा सामना करावा लागला. या आपत्तीतून शिल्लक राहिलेले सोयाबीनचे पीक सध्या काढणीला आले असताना मागील तीन दिवसापासून जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे.

Soybean Harvesting
Soybean Rate: सोयाबीनला सध्या काय दर मिळतोय? | Agrowon | ॲग्रोवन

या पावसामुळे कापणी केलेल्या सोयाबीन पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. कापणी केलेले सोयाबीन अनेक ठिकाणी पावसाने भिजले आहे. परिणामी धान्याला मोड फुटून नुकसान होत असल्याने ते पीक झाकण्यासाठी शेतकरी धावाधाव करीत आहेत. परंतु या कामालाही मर्यादा येत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

सोयाबीन कापणीसाठी यंदा साडेतीन हजार ते चार हजार रुपये प्रतिबॅगला खर्च येत आहे. अशावेळीजिल्ह्यात मंगळवारपासून वेगवेगळ्या भागात पावसाने हजेरी लावल्याने संभाव्य नुकसानीची धास्ती शेतकऱ्यांनी घेतल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी थांबविली आहे.

वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

शेतात रानडुकरापासून पिकांचे संरक्षक करण्यासाठी केलेल्या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना उमरी तालुक्यातील अस्वलदरी येथे बुधवारी (ता. पाच) घडली. गंगाधर जळबा बेकलवाड (वय ४५) हा शेतकरी रानडुकरापासून पिकांचे नुकसान होत असल्यामुळे शेतात सायंकाळी गेला होता.

यावेळी पावसाला सुरवात होऊन अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी महसुल प्रशासनाने पंचनामा करून शासनाला अहवाल कळविला आहे. दरम्यान दुसऱ्या घटनेत किनवट तालुक्यात किनवट-मांडवा रस्त्यावरील नाल्याला पूर आल्याने सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नागोराव सोनेराव तोडसाम (वय ३०, रा. पिंपळगाव कि.) हा पुरात वाहून गेला. परंतु त्याचा शोध लागला नाही, असे पोलिसांकडून कळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com