
अभिजित डाके ः ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली ः हळद विक्रीस गती येऊ लागली असतानाच देशात गतवर्षीची सुमारे २० ते २५ लाख पोती (५० किलोचे एक पोते) अजूनही व्यापाऱ्यांकडे शिल्लक आहेत. त्यातच हळदीच्या मागणीपेक्षा ( Demand for turmeric ) पुरवठा अधिक होऊ लागला आहे.
या साऱ्याचा फटका नव्या हळदीच्या दराला बसू लागला आहे. गेल्या पंधरा दिवसांत हळदीच्या दरात ( Turmeric Rate) सुमारे प्रकि क्विंटलला ५०० रुपयांनी घट झाली आहे.
यंदाच्या हंगामात हळदीच्या दरावर मंदीचे सावट आले असल्याने हळद उत्पादक ( Turmeric Producer) शेतकऱ्यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
देशात गेल्या चार वर्षांपासून हळदीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. परिणामी हळदीचे उत्पादनही वाढत आहे. उत्पादन अधिक होत असल्याने मागणी तेवढीच राहत आहे. दरवर्षी हंगामात ८० ते ८५ लाख पोती विक्रीस येतात.
परंतु मागील वर्ष ते दोन वर्षांपासून देशातील बाजारपेठेत हळदीची सुमारे १ कोटीच्या आसपास पोती येऊ लागली आहेत. यामुळे हळद शिल्लक राहण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे चित्र आहे.
हळदीच्या मागणीपेक्षा उत्पादन अधिक होत असल्याने व्यापाऱ्यांकडे हळद शिल्लक राहण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या वर्षीच्या हंगामातील सुमारे २० ते २५ लाख पोती अजूनही व्यापाऱ्यांकडे शिल्लक आहेत.
यंदाचा हळद विक्रीच्या हंगामाला गती आली आहे. देशभरात जुनी आणि नवीन अशी सुमारे १६ लाखांपेक्षा जास्त पोत्यांची विक्री होत आहे. हंगाम सुरू झाल्यापासून हळदीच्या दर कमी अधिक होत असल्याचे दिसते आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हळदीच्या दरात घसरण झाली होती. त्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात २०० ते ३०० रुपयांनी दरात वाढ झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना काही, अशी दिलासा मिळाला होता.
परंतु हळदीच्या दरात झालेली वाढ फार काळ स्थिर राहली नाही. मार्च महिन्याच्या प्रारंभीच पुन्हा हळदीच्या दरात ५०० रुपयांनी घरसण झाली आहे.
.
दर नसल्याने हळद उत्पादक चिंतेत
मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत आहे. या साऱ्यामुळे हळदीच्या दरात वाढ होताना दिसत नाही. परिणामी हळदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे.
यामुळे हळद उत्पादक शेतकरी बाजारातील हळदीच्या दराचा अंदाज घेऊन विक्री करत आहे. परंतु अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी हळद विक्रीपेक्षा साठवणूक करण्यासाठी पुढे आला आहे.
हळदीची वर्षभर मागणी तेवढीच आहे. परंतु उत्पादन वाढले आहे. या साऱ्याचा परिणाम हळदीच्या दरावर होत आहे. यामुळे सध्या हळदीच्या दरात तेजी पहायला मिळत नाही.
हळदीच्या क्षेत्रात अशीच वाढ होत राहिली तर, मंदी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
- मनोहर सारडा, हळद व्यापारी, सांगली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.