Implements : रब्बी हंगामातील पिकांसाठी सुधारित यंत्रे

कृषी यांत्रिकीकरणामुळे नैसर्गिक स्रोतांची उत्पादन क्षमता वाढते. शेतीच्या विविध कामांशी संबंधित कष्ट कमी होतात. मजुरांची कमतरता भरून काढली जाते. रब्बी हंगामासाठी उपयुक्त यंत्रे व अवजारांची माहिती घेऊ.
Implements
ImplementsAgrowon

ट्रॅक्टरचलित फुले बंदिस्त वाफे तयार करणारे अवजार

रब्बी वारीसाठी जमिनीत पावसाचे पाणी मुरविण्यासाठी बंदिस्त वाफे उपयुक्त ठरतात. त्यांच्या निर्मितीसाठी हे अवजार वापरले जाते. ३५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.

एका दिवसात ४ ते ४.५ हेक्टर क्षेत्रावर बंदिस्त वाफे तयार करता येतात.

Implements
Crop Insurance : विम्यासाठी ‘स्वाभिमानी’ची कृषी कार्यालयावर धडक

पॉवरटिलरचलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र

मका, भुईमूग, सूर्यफूल, करडई, वारी, सोयाबीन, हरभरा, तूर इ. पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते.

दोन ओळीतील अंतर २२.५, ३० अथवा ४५ सें.मी. राखता येते.

यंत्राची कार्यक्षमता ०.७५ ते १.०० हेक्टर प्रति दिवस.

सायकल कोळपे

यामध्ये तीन छोटे फण माती व तणाची मुळे ढिले करण्यासाठी बसविलेले असतात.

हे यंत्र खुरपणी व आंतरमशागत, दोन ओळींतील निंदणी करण्यासाठी वापरण्यात येते.

एक दिवसात एका माणसाच्या साह्याने ०.१५ ते ०.२० हेक्टर क्षेत्रावर कोळपणी करता येते.

पॉवर विडर

या यंत्राला स्वतंत्र रोटाव्हेटर आहे.

पिकातील तण काढण्यासाठी उपयुक्त आहे.

चक्राकार गतीने फिरणारी पाती असल्यामुळे तण निर्मूलन प्रभावीरीत्या करता येते.

या यंत्राद्वारे फळबागेतील खोडाभोवतीचे तण निर्मूलन प्रभावीपणे करता येते.

ट्रॅक्टरचलित फुले बहुपीक टोकण यंत्र

या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, वारी, सोयाबीन, हरभरा, तूर इ. पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते.

दाणेदार खतांची मात्रा शिफारशीनुसार बियाण्याच्या बाजूला देता येते.

दोन ओळींतील आणि दोन रोपांतील योग्य अंतर राखता येते.

यंत्राची कार्यक्षमता १.२५ ते १.५० हेक्टर प्रति दिवस.

Implements
Farmer Loan Waive : ‘कर्जमुक्ती’च्या यादीत १२ हजार ९४२ शेतकरी

ट्रॅक्टरचलित दोन ओळींमध्ये चालणारा फॉरवर्ड रिव्हर्स रोटाव्हेटर

ऊस पिकाच्या आंतरमशागतीसाठी उपयुक्त.

फॉरवर्डमध्ये आंतरमशागतीचे काम होते. तर रिव्हर्समध्ये उसाला आतील बाजूस मातीची भर घालता येते.

हे यंत्र ४ ते ५ फूट रुंद सरीत सहजपणे चालू शकते.

ट्रॅक्टरचलित थ्री-रोविडर

४५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.

या यंत्राला स्वतंत्र्य रोटाव्हेटर आहे.

एकाचवेळी तीन ओळींतील तण काढण्यासाठी उपयुक्त आहे.

चक्राकार गतीने फिरणारी पाती असल्यामुळे तण निर्मूलन प्रभावीरीत्या करता येते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com