Vegetables Rate : नगरला भाजीपाल्याच्या दरात सुधारणा कायम

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात भाजीपाल्याच्या दरात सुधारणा कायम राहिली. पावसामुळे पालेभाज्यांची आवक कमी होती. भाजीपाला, बटाट्याची आवकही कमी झाली होती.
Vegetables Rate
Vegetables Rate Agrowon

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत (Dada Patil Shalke APMC) टोमॅटोची दर (Tomato Rate) दिवसाला १०५ क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते २ हजार २०० रुपयापर्यंत दर मिळाला. वांगीची ४५ क्विंटल आवक होऊन २००० ते ४,५०० हजार, कोबीची ९२ क्विंटलपर्यंत आवक होऊन ७०० ते २००० , फ्लॉवरची ४० क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ५०० ते ४ हजार ५००, काकडीची ९० क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते २००० रुपये,

Vegetables Rate
Chandwad APMC : चांदवड बाजार समितीत भुसार शेतीमालाचे ऑनलाइन लिलाव

गवारची ३० क्विंटलपर्यंत आवक होऊन ३ हजार ते ९ हजार, घोसाळ्याची ९ क्विंटल आवक होऊन १ हजार ते ३ हजार ५०० , दोडक्याची २६ क्विंटल आवक होऊन १ हजार ५०० ते ४ हजार, कारल्याची ४५ क्विंटलची आवक होऊन १५०० ते ४ हजार, भेंडीची ५५ क्विंटल आवक होऊन ७०० ते २ हजार ५००,

Vegetables Rate
Lasalgaon APMC : लासलगाव समितीकडून वजनमापाची पर्यायी व्यवस्था

वाल शेंगाची ७ क्विंटलपर्यंत आवक होऊन ४ हजार ते ६ हजार, घेवड्याची ९ क्विंटलपर्यंत ३ हजार ५०० ते ६ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. मागील पंधरा दिवसात बटाट्याची बटाट्याची ६५० क्विंटल आवक होऊन १६०० ते २२०० रुपयाचा दर मिळाला होता.

Vegetables Rate
APMC Profit : खेड बाजार समितीला दोन कोटींचा नफा

मागील आठवड्यात बटाट्याची साधारण हजार दिवसाला दीडशे क्विंटल पर्यंत आवक होऊन१९०० ते २००० रुपये दर मिळाला., हिरव्या मिरचीची १०७ क्विंटल आवक होऊन तीन न हजार ते ४ हजार ५००, भुईमूग शेंगाची ५ क्विंटल आवक होऊन ३ हजार ८०० ते ४ हजार ८००, दुधीभोपळ्याचे १७ क्विंटल आवक होऊन ५०० ते ३ चार २०० , .

सिमला मिरचीची २२ क्विंटल आवक होऊन २ हजार ते ४ हजार प्रति क्विंटल दर मिळाला आहे. पालेभाज्या मेथी, कोथिंबीर, शेपू, मुळा, चुका, चवळी,कढीपत्ता याला चांगली मागणी राहिली. मात्र पावसामुळे आवक कमी होती

फळांची आवकही जेमतेम आहे.फळाची दर दिवसाला पाचशे क्विंटलपर्यंत आवक झाली. मोसंबीची ११४ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ४ हजार, संत्र्यांची १६५ क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते पाच हजार, पपईची ४१ क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० हजार ते तीन हजार रुपये, पेरूची २२ क्विंटलची आवक होऊन ५०० ते ७ हजार, डाळिंबाची २५ क्विंटलपर्यंत आवक होऊन १००० ते १३ हजार रुपयापर्यंत दर मिळत आहे. सीताफळाची ६५ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते ७ हजार रुपयापर्यंत दर मिळाला.

कांद्याच्या दरात सुधारणा...

नगर जिल्ह्यातील नगर, घोडेगाव, पारनेर बाजार समितीत कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवार (ता. १) रोजीच्या लिलावात गावरान कांद्याला नगरला प्रती क्विंटल १०० ते २५०० रुपयापर्यंत दर मिळाला. घोडेगाव बाजार समितीत एक नंबर २०० ते २२०० रुपयापर्यंत दर मिळाला. मोजके कादे ३ हजार रुपयापर्यंत गेले असे बाजार समितीचे सचीव पालवे यांनी सांगितले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com