Akola Z.P. Election : अकोला जिल्हा परिषदेत वंचित आघाडीच नंबर वन

आघाडीच्या संगीता अढाऊ यांची बहुमताने अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी सुनील फाटकर यांची निवड झाली.
Akola Z.P. Election
Akola Z.P. ElectionAgrowon

अकोला ः येथील जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) पुन्हा एकदा बाजी मारली. आघाडीच्या संगीता अढाऊ यांची बहुमताने अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी सुनील फाटकर (Sunil Phatkar) यांची निवड झाली.

Akola Z.P. Election
ZP School: खेड्यांतल्या पोरांच्या शिक्षणाचं काय होणार?

सोमवारी (ता.१७) दुपारी उशिरा याची घोषणा झाली. संगीता अढावू व उपाध्यक्ष सुनील फाटकर यांना प्रत्येकी २५-२५ मते मिळाली. महाविकास आघाडीकडून उमेदवारी दाखल करणाऱ्या राष्ट्रवादीच्या किरण अवताडे (मोहोड) व अपक्ष उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांना २३-२३ मते मिळाली. दोन मतांच्या फरकाने हा विजय झाला.

विद्यमान अध्यक्षा प्रतीभा भोजने व उपाध्यक्ष सावित्री राठोड यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ झाल्यानंतर काही महिने लोटले होते. त्यानंतर या पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. जिल्हा परिषदेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने सत्ताधारी वंचितसमोर मोठे आव्हान होते.

मात्र, भाजप तटस्थ राहल्याने सर्वकाही सुरळीत झाले. वंचितच्या सदस्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. महाविकास आघाडीचे सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com