Agrowon Agricultural Exhibition : औरंगाबादमध्ये १३ जानेवारीपासून ‘अॅग्रोवन’चे भव्य कृषी प्रदर्शन

राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व माहितीची मेजवानी घेऊन येणारे ‘अॅग्रोवन’चे ‘कृषी प्रदर्शन-२०२३’ यंदा १३ ते १६ जानेवारी दरम्यान औरंगाबादमध्ये धडाक्यात होत आहे.
Agrowon Agricultural Exhibition
Agrowon Agricultural ExhibitionAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान (Developed Technology) व माहितीची मेजवानी घेऊन येणारे ‘अॅग्रोवन’चे ‘कृषी प्रदर्शन-२०२३’ (Agrowon Agricultural Exhibition) यंदा १३ ते १६ जानेवारी दरम्यान औरंगाबादमध्ये (Agurangabad) धडाक्यात होत आहे.

Agrowon Agricultural Exhibition
Agriculture exhibition : माळेगाव यात्रेत कृषी प्रदर्शनाचे आयोजन

‘सकाळ-अॅग्रोवन’चे राज्यव्यापी कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांसाठी कृषी व संलग्न क्षेत्राची समग्र माहिती देणारा ज्ञानयज्ञच समजला जातो. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक कन्हैया अॅग्रो आहेत. तसेच असोसिएट पार्टनर म्हणून पूर्वा केमटेक प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत. याशिवाय केबी, चितळे डेअरी, एमआयटी औरंगाबाद, तृप्ती हर्बल, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, मेडा महाऊर्जा, आत्मा औरंगाबाद हे को-स्पॉन्सर्स आहेत; तर इफको हे गिफ्ट स्पॉन्सर्स आहेत.

या प्रदर्शनातून मराठवाड्यासह विदर्भ, खानदेश, मध्य व पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी माहितीचा बहुमूल्य खजिना मिळणार आहे. औरंगाबादमधील ‘अॅग्रोवन’ची यापूर्वीच २०१८ व २०१९ मधील कृषी प्रदर्शने यशस्वी झालीच; पण गर्दीचे उच्चांक मोडणारीदेखील ठरली. यंदाचे प्रदर्शन औरंगाबादच्या चिकलढाणा एमआयडीसीमधील ‘कलाग्राम’मध्ये होत आहे.

Agrowon Agricultural Exhibition
Agriculture Day : कृषी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, पोस्टर प्रदर्शन

‘अॅग्रोवन’च्या प्रदर्शनामुळे लाखो शेतकऱ्यांना शेतीमधील समस्यांशी लढण्याचे धैर्य मिळाले आहे. प्रात्यक्षिकांसह आधुनिक शेतीची तंत्र समजण्यास या प्रदर्शनाचा उपयोग होतो. विशेष म्हणजे ‘अॅग्रोवन’च्या प्रदर्शनानंतर नवनवे प्रयोग करण्यास चालना मिळाल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या कृषी प्रदर्शनात देशविदेशातील नामवंत अॅग्रो ब्रॅण्ड्‌‌स एका छताखाली येत आहेत. त्याद्वारे बागायती, कोरडवाहू आणि संरक्षित शेतीमधील समस्यांवर उपाय सूचविले जाणार आहेत. याशिवाय पूर्वा केमटेककडून आयोजित केलेले वैविध्यपूर्ण फळ प्रदर्शन शेतकऱ्यांचे आकर्षण ठरणार आहे.

या प्रदर्शनात ज्येष्ठ शास्त्रज्ञ, तज्ज्ञ, संशोधक व कृषी अभ्यासकांचे मार्गदर्शन, तसेच त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. विविध कंपन्यांच्या तंत्रज्ञानाचा आविष्कार बघतानाच आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे क्षेत्रातील कंपन्या तसेच ट्रॅक्टर, हार्वेस्टिंग यंत्रे, कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, कोल्ड स्टोअर उद्योग, ड्रीप, टिश्युकल्चर क्षेत्रातील नामवंत कंपन्या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.


प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये ः
- नामांकित कंपन्या, संशोधन संस्थांचा सहभाग
- बॅंका, खते, कीटकनाशके, बियाणे उद्योगांचे स्टॉल्स
- कृषी अवजारे, यंत्रे, ड्रीप, प्रक्रिया उद्योगांचा सहभाग
- नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा आविष्कार
- तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चेची संधी
- प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिसे जिंकण्याची संधी

‘ॲग्रोवन’चे संवादी व्यासपीठ
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये संवादाचा सेतू बांधण्याचे काम ‘ॲग्रोवन’ गेली कित्येक वर्षे करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक तज्ज्ञ, प्रयोगशील शेतकरी एकमेकांशी जोडले गेले आहेत. ‘ॲग्रोवन’मधील ज्ञानाच्या या खळाळत्या प्रवाहाचा लाभ शेतकरी घेत आहेत. प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतकरी व तज्ज्ञांच्या भेटीगाठींचे, प्रयोगांच्या देवाणघेवाणीचे हक्काचे ठिकाण म्हणून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन एकमेवाद्वितीय ठरले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com