बारामतीच्या जिरायती पट्ट्यात चाराटंचाईमुळे पशुपालक अडचणीत

बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील जवळपास प्रत्येक शेतकऱ्यांकडे पशुधन आहे. पशुधन जगविण्यासाठी पशुपालक लागतील तसे पैसे घालवून बागायती भागातून महागडा विकतचा चारा घेत आहेत.
Fodder Shortage
Fodder ShortageAgrowon

मोरगाव, ता. बारामती ः राज्यात एकीकडे अतिवृष्टी (Heavy Rain) होत आहे, तर दुसरीकडे बारामतीच्या जिरायती पट्ट्यात (Dry Land) दमदार पावसाअभावी निर्माण झालेल्या चाराटंचाईमुळे (Fodder Shortage) पशुपालक (Cattle Rearers) अडचणीत आले आहेत.

Fodder Shortage
हायड्रोपोनिक चारा म्हणजे काय?

बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील जवळपास प्रत्येक शेतकऱ्यांकडे पशुधन आहे. पशुधन जगविण्यासाठी पशुपालक लागतील तसे पैसे घालवून बागायती भागातून महागडा विकतचा चारा घेत आहेत. तालुक्याच्या पश्‍चिम भागातील मोरगाव, तरडोली, आंबी बुद्रुक, जोगवडी, मुर्टी, मोढवे, लोणी भापकर, माळवाडी, पळशी, मासाळवाडी, काऱ्हाटी या भागात अत्यल्प पाऊस पडला आहे. ऐन पावसाळ्यात मॉन्सूनच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या. सुपा मंडलातंर्गत येणाऱ्या गावामध्ये खरिपाच्या पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत.

मोरगावच्या उत्तरेस भीमा, तर दक्षिणेस नीरा नदी दुथडी भरून वाहत असताना कऱ्हा नदी पात्र, ओढे, नाले, पाझर तलाव, विहिरी, कूपनलिका कोरड्या आहेत. ऊस पिके वाळू लागली असून दुभत्या जनावरांना हिरवा चारा विकत घ्यावा लागत आहे.

Fodder Shortage
पावसाळ्यात जनावरांना हिरवा चारा किती द्याल?

खरिपातील इतर पिके शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची परिस्थिती आहे. किमान पशुधन जगविण्यासाठी बारामतीच्या जिरायत भागातील पाझर तलाव, नाले, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पुरंदर उपसा सिंचन योजनेतून भरून द्यावेत, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. गुरुवारी (ता.२८) मोरगाव परिसरात काही तासात झालेल्या पावसाची नोंद ८४ मिलिमीटर आहे. मात्र हा पाऊस पडूनही नदी, नाले, ओढे, तलाव, बंधारे कोरडे आहेत. जमिनीची तहान भागली. मात्र नैसर्गिक पाणीसाठ्यात पाणी साचले नसल्याची स्थिती आहे.

सध्या मोरगाव, तरडोली, भिलारवाडी परिसरातील शेतकरी तीन हजार रुपये टन या दराने बागायती भागातून ऊस पिकाचा चारा आणून पशुधन जगवीत आहेत. मुबलक चारा पिकविण्यासाठी पाण्याची गरज आहे. कमी चाऱ्यामुळे पशुधनाच्या दुग्ध उत्पादकतेवर परिणाम होते. हातात सतत खेळते भांडवल, शेती कसताना येणारा खर्च यासाठी पशुपालकांना दुग्ध व्यवसायाचा मोठा आधार आहे. त्यामुळे पुरंदर योजनेतून जिरायती भागात तलाव, ओढे, बंधारे भरावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com