बार्शी तालुक्यात शेतकरी पुन्हा उतरले रस्त्यावर

अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पिकविम्याचा लाभ मिळण्यासाठी बार्शी-लातूर-बीड राष्ट्रीय मार्गावर जामगाव येथील चौकामध्ये सरकार विरोधी घोषणा देत शेतकऱ्यांनी सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन केले.
 In Barshi taluka, farmers again took to the street
In Barshi taluka, farmers again took to the streetAgrowon

बार्शी : अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (Crop Damage) व पिकविम्याचा (Crop Insurance) लाभ मिळण्यासाठी बार्शी-लातूर-बीड राष्ट्रीय मार्गावर जामगाव (आ) येथील चौकामध्ये सरकार विरोधी घोषणा देत शेतकऱ्यांनी सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन केले.

 In Barshi taluka, farmers again took to the street
Cotton Crop Protection : अतिवृष्टीनंतर कापूस पिकाची घ्या काळजी

यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे. बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईतून वगळल्यामुळे पिकविम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित राहतील.

सरकारने शेतकऱ्यावर अन्याय न करता अतिवृष्टीची नुकसान भरपाई व पीक विम्याची अग्रीम रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा मंत्रालयामध्ये घुसून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशाराही गायकवाड यांनी यावेळी दिला.

 In Barshi taluka, farmers again took to the street
Soybean Rate : सोयाबीन दर पुन्हा सावरले

यावेळी बाळासाहेब जगताप, विष्णू आवटे, शिवाजी खोडवे, बालाजी कागदे, रोहित शिंदे, भाऊसाहेब आवटे, दत्तात्रय जाधव, मारुती आवटे, परमेश्वर आवटे, पंकज आवटे, वैजिनाथ आवटे, बबन गडदे, विनोद आवटे, प्रशांत आवटे, शंकर लटके, हरीष लोखंडे, चंद्रसेन यादव, बापू गरदडे, विठ्ठल गरदडे, गणेश यादव, सचिन लोखंडे, अभिजित लोखंडे, माणिक गरदडे, हनुमंत यादव, सुरेश यादव आदीसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन पांगरी मंडल अधिकारी विशाल नलवडे यांनी स्‍वीकारले. आंदोलनावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com