Onion Sowing : धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत कांदा लागवडी घटल्या

जळगाव जिल्ह्यात लागवडींना अतिपावसाचा फटका
Onion Sowing
Onion SowingAgrowon

जळगाव : धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत यंदा खरिपातील (Khareef Season) कांदा लागवड घटली आहे. या दोन्ही जिल्ह्यांत सुमारे पाच हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. जळगाव जिल्ह्यातही लागवड सुमारे अडीच हजार हेक्टरवर झाली आहे. अतिपावसाने (Wet Drought) कांदा पिकाला फटका बसला आहे.

Onion Sowing
Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी

यातच दर कमी असल्याने कांदा लागवड टाळण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी यापूर्वीच घेतला होता. मागील वर्षभर दर दबावात आहेत. कमाल दर अनेकांना ५०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक मिळालेला नाही. पीक न परवडल्याने मागील एप्रिल व मे महिन्यात अनेकांनी शेतातच गाडले. यामुळे खरिपात लागवड घटेल, असा अंदाज सुरवातीपासून होता.

Onion Sowing
Wet Drought :मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीस प्राधान्य देवू ः फडणवीस

त्यातच जुलै व ऑगस्टमध्ये खानदेशात अतिवृष्टी झाली. अतिपावसात रोपवाटिकांमध्ये कांद्याचे २० ते २५ टक्के नुकसान झाले.

दरम्यान, ऑगस्टअखेर लागवड सुरू झाली. सप्टेंबरमध्येही १६ ते १९ दरम्यान अतिवृष्टी अनेक भागांत झाली. यामुळे पिकांची हानी झाली आहे. लागवड कमी व पिकहानी यामुळे क्षेत्र आणखी घटले आहे.

Onion Sowing
Lumpy Vaccination : तेवीस हजार ५०४ जनावरांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात लसीकरण

धुळे व नंदुरबारात कांद्याची दरवर्षी खरिपात आठ ते १० हजार हेक्टरवर लागवड केली जाते. परंतु, यंदा लागवड ४० टक्के घटली आहे. जळगाव जिल्ह्यातही तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर लागवड असते. जिल्ह्यातही लागवड सुमारे दीड हजार हेक्टरने कमी झाल्याचे सांगितले जात आहे. हवामान अनुकूल नसल्याने कांदा पिकाची वाढही हवी तशी नाही.

सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातील अतिपावसाने जळगाव जिल्ह्यातील यावल, चोपडा, धरणगाव भागात कांदा पीक १०० टक्के खराब झाले आहे. कांदा पिकाचे पंचनामे केले जात नाहीत. त्यामुळे भरपाईदेखील मिळत नाही. यामुळे कांदा उत्पादकांना दुहेरी फटका बसला आहे.

पुन्हा रोपवाटिका तयार

धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे भागातही अतिपावसाने कांद्याचे नुकसान झाले.

काही शेतकऱ्यांनी पुन्हा रोपवाटिका तयार केल्या आहेत. ऑक्टोबरअखेरीस त्याची पुनर्लागवड होईल. जानेवारीत या कांद्याची काढणी होईल.

कांद्याची अतिपावसात हानी झाली आहे. पण मदतीच्या निकष, प्रमाणकांतून कांद्याला वगळले आहे. त्यासंबंधी पंचनामेदेखील केले जात नाहीत. हा कांदा उत्पादकांवर अन्याय आहे.

- कडूअप्पा पाटील, नेते, शेतकरी संघटना, जळगाव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com