Yellaki Banana : जळगाव जिल्ह्यात येल्लकी केळीखालील क्षेत्र वधारतेय

अधिकचे दर, बाजारातील मागणी आणि नफा आदी बाबींमुळे केळीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात अलीकडच्या तीन वर्षांत तमिळनाडू व इतर दाक्षिणात्य भागात घेतल्या जाणाऱ्या येल्लकी वाणाच्या केळीखालील क्षेत्र वाढत आहे.
Yellaki Banana
Yellaki BananaAgrowon

अधिकचे दर, बाजारातील मागणी आणि नफा आदी बाबींमुळे केळीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात अलीकडच्या तीन वर्षांत तमिळनाडू व इतर दाक्षिणात्य भागात घेतल्या जाणाऱ्या येल्लकी (Yellaki Banana) वाणाच्या केळीखालील क्षेत्र वाढत आहे. चोपडा तालुक्यातून या केळीचा प्रसार झाला. आता जामनेर, जळगाव, रावेर, यावल, पाचोरा आणि धुळ्यातील शिरपूर तालुक्यातही येल्लकी केळीची लागवड होऊ लागली आहे.

Yellaki Banana
खानदेशात कांदेबाग केळीखालील क्षेत्रात वाढ 

येल्लकी वाण हा तमिळनाडूमधील आहे. त्रिचीच्या उत्तरेस व मदुराई भागात ही केळी असते. कर्नाटकातील म्हैसुरातही हा वाण असतो. वढोदा (ता. चोपडा) येथील संदीप सुभाष पाटील हे राष्ट्रीय केळी परिषदेनिमित्त त्रिची येथे गेले होते. तेथे येल्लकी वाणाच्या केळी पिकाची पाहणी केली. जळगाव जिल्ह्यात सर्वप्रथम २०२० च्या सुरुवातीला त्याची लागवड संदीप सुभाष पाटील यांनी आपल्या वढोदा (ता. चोपडा) येथील शेतात केली होती.

Yellaki Banana
Banana : सांगली जिल्ह्यात केळीच्या क्षेत्रात घट

उतिसंवर्धित केळी रोपे तमिळनाडू येथील एका केंद्रातून रोपे पुरवठादार कंपनीच्या मदतीने मागवून घेतली होती. चार हजार रोपांची लागवड सात बाय पाच या अंतरात गादी वाफ्यावर केली होती. एक एकरात १२४० झाडे होती. लागवडीनंतर दहाव्या महिन्यांत काढणी सुरू झाली. सरासरी १२ टन एवढी रास होती. १४ टन एकरी उत्पादन हाती आले होते. तिची १०० टक्के खरेदी सह्याद्री फार्म्स (नाशिक) यांनी थेट शेतात येऊन केली होती. त्या वेळेस या केळीला देसाई, रिलायन्स आदी कंपन्यांकडूनही मागणी होती.

चार हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर सुरुवातीला होता. तसेच एकदा ५२०० रुपये प्रतिक्विंटलचा दरही मिळाला होता. सरासरी दर ४२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. नंतर संदीप यांनी आपल्या क्षेत्रात खोडवा पीकही येल्लकीतून घेतले.
२०२१ सुरुवातीला येल्लकी केळी वाणांच्या ७० हजार रोपांची लागवड जळगाव जिल्ह्यात झाली. तसेच धुळे जिल्ह्यातही सुमारे ६० हजार रोपांची लागवड झाली आहे. २४ रुपये प्रतिरोप या दरात येल्लकीची रोपे पडत आहेत.

अर्थात, एकूण सुमारे १०० एकरांत येल्लकीची लागवड झाली आहे. धुळ्यातील बभळाज, तरडी, भावेर भाग येल्लकीचे क्लस्टर बनत आहे. जळगावमधील जामनेर, रावेर पाचोरा, जळगाव तालुक्यांतही लागवड झाली आहे. या क्षेत्रातही काढणी सुरू आहे. यंदा ४५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. सह्याद्री फार्म्स, रिलयन्स, देसाई आदी कंपन्या खरेदी करीत असून, चांगले दर शेतकऱ्यांना मिळत आहेत.

या वाणाचा एकरी खर्च व उत्पन्न
एकरी खर्च या वाणासंबंधी ग्रॅण्ड नैन व इतर वाणांच्या रोपांच्या तुलनेत कमी आहे. ग्रॅण्ड नैन व इतर वाणांसाठी एकरी ६० ते ७० हजार किंवा एक लाखांपर्यंत खर्च आहे. येल्लकीसाठी एकरी खर्च ४० हजार रुपये आहे. काही शेतकरी ४५ हजार रुपये प्रति एकर खर्च करीत आहेत. पण चांगले दर व रोगराईची भीती कमी असल्याने या केळीकडे शेतकरी वळत आहेत. तसेच एकरी किमान तीन लाख रुपये निव्वळ नफा मिळत आहे. येल्लकीची आवक बाजारात अत्यल्प असते. इतर केळीची आवक अनेकदा वाढते व तिचे दर कमी होतात. पण येल्लकीची आवक कुठेच वाढत नाही, त्यामुळे तिचे दर मागील दोन वर्षे सतत टिकून राहिले. शेतकऱ्यांनी ब्रॅण्डिंग केल्यास पुढे उत्तर भारताकडूनही मागणी वाढेल, असा अनुभव शेतकरी संदीप सांगतात.

...या भागात आहे मागणी
उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली या राज्यांतही या वाणाची मागणी होऊ लागली आहे. तसेच राज्यात मुंबई, पुणे, नाशिक येथील मॉल्समध्येही मागणी आहे. मुंबई येथील वाशी बाजारात मोठी उचल या वाणाला आहे. जळगाव जिल्ह्यातील संदीप पाटील यांनी यंदा आपल्या येल्लकीच्या खोडवा केळीची कमाल विक्री वाशी बाजारात केली.



लागवडीचा काळ असा असावा
येल्लकीची वाण अधिक किंवा २० फुटांपर्यंत असते. मे, जूनमध्ये ती काढणीवर येणार नाही, या दृष्टीने शेतकरी लागवड करतात. कारण मे व जूनमध्ये खानदेशात वादळी पाऊस, अधिक वाऱ्याची समस्या व तापमानही असते. या केळीला ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये
मोठी मागणी असते. यामुळे शेतकरी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये लागवडीचे नियोजन साध्य करीत आहेत.



येल्लकीची वैशिष्ट्ये ः
- पानांसह २० फुटांपर्यंत उंच वाढते
- वाऱ्यात तग धरून राहते, स्टपमध्ये लवचिकता चांगली असल्याने पडझडीचे प्रमाण कमी
- कमी पाण्यातही येण्याची क्षमता
- घड आकाराने लहान, केळीही आखूड (साडेतीन ते चार इंच केळीची लांबी)
- करपा, सीएमव्ही आदी रोगांना प्रतिकारक्षम
- एका केळीत ९० पर्यंत कॅलरी
- कर्ब्सचे प्रमाण २१ ग्रॅम
- प्रोटीन १.३ ग्रॅम
- फॅट्सचे प्रमाण ०.३ ग्रॅम
- फायबर ३ ग्रॅम
- पोटॅशिअम ९ टक्के (रेफरन्स डेली इंटेक)
- व्हिटॅमिन बी ६.२८ टक्के (आरडीआय)
व्हिटॅमिन सी ९ टक्के (आरडीआय)
मॅग्नेशिअम ८ टक्के (आरडीआय)

मोबाईल संदीप पाटील, ९०७५४५७६६५

Yellaki Banana
Fertilizer Shortage : जळगाव जिल्ह्यात कृत्रिम खतटंचाई कायम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com