Rain Update : खानदेशात पाऊस वाढला नुकसानीचे आकडेही वाढले; पंचनाम्यांबाबत स्पष्टता नाहीच

खानदेशात मागील तीन दिवसांत पाऊस वाढला आहे. नुकसानही या अतिपावसात वाढत असून, पंचनाम्यांबाबत यंत्रणा आदेश नसल्याचे सांगत आहे.
In Khandesh, the rainfall increased and the damage figures also increased; There is no clarity on the panchnamas
In Khandesh, the rainfall increased and the damage figures also increased; There is no clarity on the panchnamasAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

जळगाव ः खानदेशात मागील तीन दिवसांत पाऊस (Rain) वाढला आहे. नुकसानही या अतिपावसात वाढत असून, पंचनाम्यांबाबत यंत्रणा आदेश नसल्याचे सांगत आहे.

शेतकरी नुकसानीमुळे (Crop Damage) तलाठी, कृषी सहायक यांच्याकडे तक्रारी करीत आहेत. परंतु शासनाची यंत्रणा आदेश नाहीत, आदेश येऊ द्या, असे सांगत आहे. जळगावात जळगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, अमळनेर, पारोळा या भागांत अतिपाऊस झाला आहे. तसेच रावेर, यावलमध्येही काही मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. यामुळे कापूस, सोयाबीन पिकाची हानी झाली आहे. परंतु याबाबत प्रशासनाकडून आदेशांची प्रतीक्षा ग्रामीण पातळीवरील शासकीय यंत्रणा करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम आहे.

In Khandesh, the rainfall increased and the damage figures also increased; There is no clarity on the panchnamas
Weather Update : पूर्व विदर्भात पाऊस वाढणार

अतिवृष्टीबाबत जळगाव जिल्ह्यात तोकडी मदत मध्यंतरी जाहीर झाली. अतिवृष्टी जुलैत झाली नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले. परंतु या महिन्यात अनेक भागांत अतिवृष्टी झाली आहे.

जळगाव, धुळे, नंदुरबारमधील ३० महसूल मंडलांत अतिपावसाने कापूस, सोयाबीन, उडीद, ज्वारी या पिकांची हानी झाली आहे. पावसासोबत सुसाट वाराही होता. त्यातही कापूस, मका, ज्वारी पीक अनेक भागात लोळले आहे. परंतु या नुकसानीबाबत प्रशासनाने कानावर हात ठेवल्याचे दिसत आहे. कारण नुकसान ३० टक्क्यांवरही नाही, अशी बतावणी अनेक भागात तलाठी, मंडल अधिकारी करून वेळ मारून नेत आहेत. परंतु रोज पाऊस सुरू आहे.

In Khandesh, the rainfall increased and the damage figures also increased; There is no clarity on the panchnamas
Soybean Crop : सोयाबीन क्षेत्रात १९ हजार हेक्टरने वाढ

मागील १२ दिवसात फक्त दोन दिवस कोरडे गेले. जोरदार पाऊस येत आहे. तासाभरात काही महसूल मंडलांत ६० मिलिमीटर पाऊस झाल्याने नुकसान अधिक झाले आहे. रोज दुपारी किंवा रात्री पाऊस येत आहे. कापूस वेचणी, फवारणी, तणनियंत्रण आदी कामे ठप्प आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. काळ्या कसदार जमिनीत सखल भागात पाणी साचून पीक पुरते हातचे गेले आहे.

In Khandesh, the rainfall increased and the damage figures also increased; There is no clarity on the panchnamas
Cotton Rate : पाकिस्तानची कापूस मागणी दराला आधार देईल का? | Agrowon | ॲग्रोवन

पपई पिकालाही फटका

पपई पिकासही फटका बसत आहे. अतिपावसात पीक पिवळे पडत आहे. पपईला अतिपावसाची मोठी बाधा होते. काळ्या कसदार जमिनीत हे नुकसान अधिक आहे. सातपुड्यालगत नंदुरबारात शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, यावल भागात पपईचे नुकसान अधिक झाले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com