Crop Loan : परभणी जिल्ह्यात ३२ हजार शेतकऱ्यांनी केले कर्ज नूतनीकरण

आजवर कर्जवाटपात ३२ हजार ३०६ शेतकऱ्यांनी २५१ कोटी ६७ लाख रुपये एवढ्या रकमेच्या कर्जाचे नूतनीकरण करून घेतले आहे. तर, एकूण ४ हजार ९४ शेतकऱ्यांना ४४ कोटी ८५ लाख रुपये नवीन कर्ज वाटप करण्यात आले.
Crop Loan
Crop LoanAgrowon

परभणी ः जिल्ह्यात या वर्षीच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात गुरुवारी (ता.१५) अखेर एकूण ३६ हजार ४०० शेतकऱ्यांना २९६ कोटी ५२ लाख रुपये (४७.४६ टक्के) कर्जवाटप झाले आहे. आजवर कर्जवाटपात (Crop Loan) ३२ हजार ३०६ शेतकऱ्यांनी २५१ कोटी ६७ लाख रुपये एवढ्या रकमेच्या कर्जाचे नूतनीकरण करून घेतले आहे. तर, एकूण ४ हजार ९४ शेतकऱ्यांना ४४ कोटी ८५ लाख रुपये नवीन कर्ज वाटप करण्यात आले.

Crop Loan
Crop Loan : लासलगाव समितीतर्फे यंदाही शेतीमाल तारण कर्ज योजना

परभणी जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात विविध बँकांना ६२४ कोटी ८० लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यात राष्ट्रीयकृत बँकांना ३६१ कोटी ७३ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ८६ कोटी ९५ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १२९ कोटी १८ लाख रुपये, खासगी बँकांच्या ४६ कोटी ९४ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत राष्ट्रीयकृत बँकांनी २१ हजार ७६ शेतकऱ्यांना २०७ कोटी २४ लाख रुपये (५७.२९ टक्के) पीककर्ज वाटप केले.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २ हजार ४९१ शेतकऱ्यांना २३ कोटी ९९ लाख रुपये (२७.५९ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १२ हजार १६४ शेतकऱ्यांना ५५ कोटी ८३लाख रुपये (४३.२२ टक्के), खासगी बँकांनी ६६९ शेतकऱ्यांना ९ कोटी ४६ लाख रुपये (२०.१५ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बँका पीककर्ज वाटपात आघाडीवर आहेत.त्यानंतर जिल्हा बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, खासगी बँका असा क्रम आहे. गतवर्षी (२०२१) १५ डिसेंबर अखेरपर्यंत २७ हजार ४६६ शेतकऱ्यांना २०५ कोटी ३९ लाख कर्ज वाटप केले होते.

Crop Loan
Crop Loan : सांगली जिल्हा बॅंकेकडून ३४६ कोटींचे कर्ज मंजूर

रब्बी पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये) १५ डिसेंबरपर्यंत

बँक उद्दिष्ट वाटप रक्कम शेतकरी संख्या टक्केवारी

भारतीय स्टेट बँक २३१.५८ १८६.०६ १९१७७ ८०.३४

महाराष्ट्र ग्रामीण बँक ८६.९५ २३.९९ २४९१ २७.५९

जि.म.सहकारी बँक १२९.१८ ५५.८३ १२१६४ ४३.२२

बँक ऑफ बडोदा २६.६९ ४.७६ ५०५ १७.८३

बँक ऑफ इंडिया ४.८० ०.८० ६९ १६.६७

बँक ऑफ महाराष्ट्र ३२.७६ ११.८७ ९४० ३६.२३

कॅनरा बँक १९.१९ १.८८ १९२ ९.८०

इंडियन बँक ९.७८ ०.१२ १७ १.२३

इंडियन ओव्हरसीज बँक ४.२१ ०.३७ ३२ ८.७९

पंजाब नॅशनल बँक ४.३९ ०.४० ४७ ९.११

युको बँक ९.५८ ०.०९ ८ ०.९४

युनियन बँक ऑफ इंडिया १३.८५ ०.११ .१५ ०.७९

अॅक्सिस बँक ५.०७ ०.६१ १४ १२.०३

एचडीएफसी बँक १५.४७ १.५२ ७७ ९.८३

आयसीआयसी बँक १२.२४ ६.३८ ४२३ ५२.१२

--------------------

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com