Rohit Pawar : ‘एमआयडीसी’ला तत्त्वतः मान्यता

रोहित पवार ः अधिवेशनात मांडली लक्षवेधी
Rohit Pawar News
Rohit Pawar News Agrowon

नगर : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी निवडणुकीच्या प्रचारात ‘एमआयडीसी’चा शब्द दिला होता, तसेच त्यासाठी पाठपुरावादेखील केला होता. नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या एमआयडीसीला उद्योगमंत्र्यांनी तत्त्वतः मंजुरी दिली आहे. आमदार रोहित पवार यांनी ही माहिती दिली.

Rohit Pawar News
Rohit Pawar: सत्ताबदलाचा परिणाम निधीवर नाही, श्रेयवादावर होईल

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात औद्योगिक क्षेत्र निर्माण व्हावे, यासाठी आमदारपदी विराजमान झाल्यानंतर २०१९ च्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात पवार यांनी तत्कालीन मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २९ जानेवारी २०२० रोजी बैठकदेखील पार पडली. या बैठकीत सदर प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्यात यावी व तसा सविस्तर अहवाल उच्चाधिकार समितीच्या विचारार्थ सादर करावा, असे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले.

Rohit Pawar News
देशातील ७१ नव्या इथेनॉल प्रकल्पांना तत्त्वतः मंजुरी

दरम्यान, कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांमध्ये योग्य ठिकाणासाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्याद्वारे कर्जत तालुक्यातील पाटेगाव व खंडाळा येथील जागेची निवड करण्यात आली. तेथील क्षेत्राची सहमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली भू-निवड समितीने १८ नोव्हेंबर २०२१ ला पाहणी केली. त्यानंतर सदर क्षेत्राचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले. १४ जुलै २०२२ ला उच्चाधिकार समितीच्या बैठकीत पाटेगाव व खंडाळा येथील सुमारे ४५८.७२ हेक्टर क्षेत्रास तत्त्वतः मान्यता देण्यात आली.

अद्याप या क्षेत्राची अधिसूचना निघाली नसल्याने आमदार पवार यांनी २३ डिसेंबर २०२२ ला विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी मांडली. त्याअनुषंगाने उद्योगमंत्र्यांनी कर्जत तालुक्यातील पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यास तत्त्वतः मान्यता दिल्याची माहिती पवार यांनी दिली.

प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची योजना आणली जाईल, असा शब्द सर्व महिला-भगिनींना दिला होता, तो मी पूर्ण केला. एमआयडीसीचा शब्ददेखील दिला होता. तोही शब्द मी पूर्ण केला, याचा आनंद आहे. यासाठी महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे, सर्व अधिकारी आणि आताचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मी आभार व्यक्त करतो.- रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com