Wet Drought : सातारा जिल्ह्यात ७ हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने बाधित

शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षाच; केवळ आकड्यांचा खेळ सुरू
Wet Drought
Wet DroughtAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : सप्टेंबरनंतर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या (Wet Drought) नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले. पण, शासनाकडून अद्याप मदतीची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. केवळ पंचनामे आणि आकड्यांचाच खेळ सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २४ हजार ७०० शेतकरी मदत निधीच्या प्रतिक्षेत आहेत. ऑक्टोबरमध्ये ७४२० हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. आता हिवाळी अधिवेशनापूर्वी तरी शेतकऱ्यांना मागील मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Wet Drought
Wet Drought : राजकीय घडामोडीत ओल्या दुष्काळाकडे दुर्लक्ष

खरिपातील पिके काढणीस आली आणि परतीच्या पावसाने त्यांचे मोठे नुकसान केले. सप्टेंबरमध्ये देखील पाच ते सहा तालुक्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे झाले. त्यानंतर त्यांचा अहवाल शासनदरबारी पोहोचला. पण, मदतीची प्रतिक्षा संपलेली नाही.
दरम्यान, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली. यामध्ये तब्बल २४ हजार ७०० शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला. सात हजार ४२० हेक्टरवरील खरीप, बागायती व फळबागांचे एकूण १७ कोटी चार लाख ३४ हजारांचे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक फटका कोरेगाव, खटाव, माण, फलटण, वाई या तालुक्यांना बसला. आता या सर्व नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्याचा अहवाल शासन दरबारीही गेला. पण, अजून मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही.

Wet Drought
Wet Drought : ओल्या दुष्काळाऐवजी पंचनाम्यांचा धडाका हे नाटक

बाधित शेतकरी संख्या अशी...
तालुकानिहाय बाधित शेतकरी संख्या अशी आहे. सातारा २१, कोरेगाव ६७६, खटाव ५०७७, कराड २११, पाटण ९३९, माण ४६४३, महाबळेश्वर ५९९, फलटण २५५२, खंडाळा १४३४, वाई ८६०० असे एकूण २४ हजार ७०० शेतकऱ्यांचा समावेश आहे.

सरकारसह विरोधकांचे दुर्लक्ष
सध्या सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपात दंग आहेत. जनतेच्या प्रश्नांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. हा कलगीतुरा बंद करून सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीकडे लक्ष द्यावे. तसेच हिवाळी अधिवेशनापूर्वी मदत मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com