Hoof Trimming : ‘खूर साळणी’ अभावी राज्यात जनावरांत बळावताहेत आजार

‘हूप ट्रिमर’ अनुदानावर मिळण्याची पशुपालकांची मागणी
Hoof Trimming| Hoof Trimming Cow | Cattle Hoof Trimming Services
Hoof Trimming| Hoof Trimming Cow | Cattle Hoof Trimming Services Agrowon

विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर ः गोठ्यामध्ये बांधून असलेल्या दुधाळ गाई (Milch Cow), म्हशींना दररोज फारसा फिरण्याचा व्यायाम नसतो. त्यामुळे त्यांच्या खुरांची झीज होत नाही. परिणामी अनियंत्रीत पद्धतीने खूर वाढल्याने त्यांना चालणे तसेच उभारण्यामध्ये अडचणी येतात, शारीरिक ताण वाढतो. त्याचा परिणाम दूध उत्पादन आणि आरोग्यावर होत आहे.

Hoof Trimming| Hoof Trimming Cow | Cattle Hoof Trimming Services
Lumpy Skin : खेडमध्ये पाळीव जनावरांत ‘लम्पी स्कीन’सदृश लक्षणे

त्यामुळे राज्यात शास्त्रोक्‍त पद्धतीने खूर साळणीसाठी ‘हूप ट्रिमर’ची उपलब्धता व्हावी, अशी मागणी पशुपालकांमधून होत आहे. ‘हूप ट्रिमर’चे दर हे काही लाखांच्या घरात आहे. त्यामुळे अनुदानावर हे यंत्र देण्याची मागणी देखील पशुपालकांनी केली आहे.
देशी गोवंशाला चरण्यासाठी बाहेर सोडले जाते. त्यामुळे त्यांच्या खुरांची झीज होते. परिणामी त्यांच्यामध्ये उभे राहण्यासोबतच चालण्याची समस्या निर्माण होत नाही.

Hoof Trimming| Hoof Trimming Cow | Cattle Hoof Trimming Services
Lumpy Skin : खेडमध्ये पाळीव जनावरांत ‘लम्पी स्कीन’सदृश लक्षणे

संकरित गाई तसेच बंदिस्त पशूपालन असलेल्या ठिकाणच्या जनावरांचे खूर दुर्लक्ष केल्याने अनियंत्रीत वाढतात. परिणामी त्यांना चालण्यात अडचण निर्माण होते. त्या लंगडतात. त्यांना व्यवस्थित उभे राहता येत नाही.
निमगाव जाळी (ता. संगमनेर, जि. नगर) येथील पशूपालक रामनाथ वदक म्हणाले की, त्यांच्या झेप शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांकडे सुमारे एक हजार जनावरे आहेत.

Hoof Trimming| Hoof Trimming Cow | Cattle Hoof Trimming Services
खूर समस्येवर योग्य पोषण हाच उपाय

जनावरे गोठ्यात जागेवर बांधलेली असल्याने दरवर्षी त्यांची खुरसाळणी करावी लागते. खासगी व्यक्तीद्वारे हे काम होते. त्यासाठी प्रति जनावर दरवर्षी ५०० रुपये खर्च होतो. खूरसाळणीसाठी असलेले हूप ट्रिमर अडीच ते पावणेतीन लाख रुपयांचे आहे. राज्य शासनाकडून अनुदानावर ते मिळाल्यास राज्यातील हजारो पशुपालकांना त्याचा उपयोग करणे शक्‍य होईल. सध्या राज्यात पशुसंवर्धन विभागाकडे अशा प्रकारची यंत्रणा नाही.

जनावर फिरल्याने खुराची झीज होते. जागेवर बांधलेल्या जनावरांमध्ये शुर वाढीच्या समस्या निर्माण होतात. जनावरे लंगडतात. त्यामुळे तंत्रशुद्ध पद्धतीने खूर कापण्याची सुविधा असावी. राज्यात काही व्यक्‍ती अशा सेवा देतात. अनुदानावर हे संयंत्र उपलब्ध झाल्यास गावस्तरावर रोजगार निर्मिती साध्य होईल.
- डॉ. रामदास गाडे, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना.


अनियंत्रीत पद्धतीने वाढलेल्या खुरामुळे जखम झाल्यास अल्सर होण्याची शक्यता असते. चामडी व खूरमधील भागांत कोरोनायटीस आजार होतो. खूर गळून पडण्याची शक्‍यता राहते. खुराची प्रमाणबद्ध लांबी ही ७.५ सेंटिमीटर आहे. त्यापेक्षा अधिक लांबी वाढल्यास जनावरांना वजन पेलणे असह्य होते. सध्या खूर घासण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक ट्रिमर आले आहे. त्याची किंमत काही हजारांत आहे. खुरांची अनियंत्रित वाढ तसेच दुर्लक्षामुळे होणाऱ्या आजारांबाबत जागृती वाढविली पाहिजे.
- डॉ. रत्नाकर राऊळकर, सहाय्यक प्राध्यापक,
स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, माफसू.

-
काही खासगी कंपन्या पंजाबमधील पशूपालकांना हूप ट्रिमर वापराबाबत विदेशात प्रशिक्षण देतात. त्या भागात खूरसाळणी विषयक शेतकऱ्यांमध्ये जागरूकता आहे. आमच्याकडे एक हजारावर जनावरे आहेत. दरवर्षी ५०० रुपये प्रमाणे प्रति जनावर खूर साळणीवर खर्च होतो. पशुसंवर्धन विभागामार्फत ही सुविधा किंवा हूप ट्रिमर अनुदानावर मिळाल्यास पशुपालकांना फायदा होईल.
- रामनाथ वदक, संचालक, झेप शेतकरी उत्पादक कंपनी,
निमगाव जाळी, ता. संगमनेर, जि. नगर.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com