Sericulture : रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

हवामान बदलाच्या पार्श्‍वभूमीवर शेतीव्यवसायात स्थिरता येण्यासाठी व अधिक नफ्यासाठी शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा अवलंब करावा,’’ असे प्रतिपादन जिल्हा रेशीम अधिकारी अजय मोहिते यांनी केले.
Silk Farming
Silk Farming Agrowon

जालना : ‘‘हवामान बदलाच्या (Climate Chnage) पार्श्‍वभूमीवर शेतीव्यवसायात स्थिरता येण्यासाठी व अधिक नफ्यासाठी शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा (Silk Farming) अवलंब करावा,’’ असे प्रतिपादन जिल्हा रेशीम अधिकारी अजय मोहिते यांनी केले. खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने महारेशीम अभियान (Mahareshim Abhiyan) २०२३ अंतर्गत जिल्हा रेशीम कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. ८) पोकळ वडगाव ता. जि. जालना येथे शेतकरी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Silk Farming
Silk Farming : रेशीम उद्योग अभ्‍यासक्रमासाठी नाव नोंदणी करा

श्री. मोहिते म्हणाले, की रेशीम पीक पद्धती ही काळाची गरज आहे. रेशीम शेतीचा विस्तार करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी महोदय सकारात्मक आहेत. जालना जिल्ह्यात १००० एकरांवर रेशीम उद्योग वाढविण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. पोकळ वडगाव येथील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महारेशीम अभियान अंतर्गत १५ डिसेंबर पूर्वी रेशीम कार्यालयात नाव नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. व्ही. सोनुने प्रास्ताविकात म्हणाले, ‘‘पोकळ वडगाव हे गाव निक्रा प्रकल्पाअंतर्गत दत्तक घेण्यात आले आहे.’’ पीक संरक्षण तज्ज्ञ अजय मिटकरी यांनी रेशीम उद्योग, त्याची उभारणी, लागवड या सर्व मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी अभियंता पंडित वासरे यांनी रेशीम उद्योग विषयी तांत्रिक मुद्द्यावर चर्चा केली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वरिष्ठ संशोधन सहायक एस. ए. पठाण यांनी केले. या कार्यक्रमाला रेशीम उद्योग नोंदणीसाठी इच्छुक असणारे व रेशीम शेती करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com