Food Park: औरंगाबादच्या ऑरिकमध्ये १७८ एकरांवर फूड पार्क

बिडकीन येथे १ हजार एकरावर टेक्स्टाइल पार्क प्रस्तावित
Food Park
Food ParkAgrowon

औरंगाबाद : येथील ऑरिकमध्ये (OREC)आगामी काळात १७८ एकरांवर फूड पार्क, (Food Park) बिडकीन येथे १ हजार एकरावर टेक्स्टाइल पार्क,(Textile Park) तर ऑरिक येथे आयटी कंपन्यांसाठी, (IT Company) तसेच ९ एकर जागेवर इंटरनॅशनल कन्व्हेक्शन सेंटरचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

Food Park
Sugar Market : आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय पांढऱ्या साखरेला पसंती

ऑरिकला स्वतः वीज निर्माण करण्यासह वितरणाची परवानगी मिळाली असल्याची माहिती ‘एआयटीएल’चे (ऑरिक) व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी शुक्रवारी (ता. ३०) पत्रकार परिषदेत दिली.

Food Park
Sugar Mill : सुधाकरपंत परिचारकांचे पांडुरंग कारखान्याला नाव

औद्योगिक परिषदेदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. श्री. काकाणी म्हणाले, की ऑरिकमध्ये ७ हजार २० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. १२ कंपन्यांनी उत्पादन सुरू केले तर ५० पेक्षा जास्त कंपन्यांचे बांधकाम सुरू आहे.

Food Park
Sugar Mill : माळेगाव कारखान्याने दिला ३,१०० रुपये अंतिम ऊसदर

फूड, टेक्स्टाइल आणि आयटी पार्कसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. ते केंद्र सरकारकडे पाठविले जातील. बिडकीन येथे १७८ एकरांवर फूड पार्कसाठी जागा प्रस्तावित आहे. येथे छोटे, मध्यम आणि मोठ्या उद्योगांनी प्रक्रिया उद्योग स्थापित केले, तर मराठवाड्यातील शेतीमालाला चांगला दर मिळेल तसेच रोजगारनिर्मिती होईल.

Food Park
Sugar Mill : नॅचरल उद्योग समूह पंधरा टक्के लाभांश

प्राथमिक स्तरावर साफसफाई, ग्रेडिंग करणे, सेकंडरीमध्ये त्या मालाचे स्टोअरेज केले, तर चांगला दर असताना ते विक्री करता येतील तर फिनिश प्रॉडक्टमध्ये या मालावर प्रक्रिया करता येईल. या सर्वांची माहिती आजच्या परिषदेत उद्योजकांना देण्यात आली.

बिडकीन येथे एक हजार एकरांवर टेक्स्टाइल पार्कचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मराठवाड्यात कापसाचे चांगले उत्पादन होते. तसेच येथील पैठणी तसेच रेडिमेड कपडे तयार केले तर रोजगाराच्या संधी मिळतील. ऑरिकमध्ये आयटी इंडस्ट्री उभी राहावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी ऑप्टिकल फायबर नेटवर्क तयार केलेले आहे.

तसेच येथे कुशल मनुष्यबळ असल्याची माहिती उद्योजकांना देण्यात आली. त्यावर त्यांच्या सूचना, अपेक्षा ऐकण्यात आल्या. या आठवड्यात काही उद्योजक जागा पाहणी करणार आहेत. नोव्हेंबरमध्ये आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग आणण्यासाठी ५० पेक्षा जास्त उद्योगांना आमंत्रित केले जाणार आहे.

४२ टक्के पाण्याचा पुनर्वापर

‘ऑरिक’मध्ये एमआयडीसीकडून २० एमएलडी पाणी घेतले जात आहे. त्यातील ४२ टक्के पाण्याचा फेरवापर केला जात आहे. भविष्यात येथे हरित प्रकल्पासाठी काम केले जात आहे. विजेची गरज भागविण्यासाठी सौर पॅनेल लावले जातील. रस्त्याच्या अडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाला पत्र देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

ऑरिक हा महत्त्वाचा टप्पा

दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर, अर्थात डीएमआयसी अंतर्गत ऑरिक हा महत्त्वाचा टप्पा आहे. शुक्रवारी परिषदेदरम्यान एमएसएमबीचे सतीश वराडे यांनी फूड सेक्टरमधील संधी व आवश्यकता याविषयीचे सादरीकरण केले. टेक्स्टाइल या विषयात प्रशांत नरवडे, मंजित कॉटनचे संचित राजपाल यांनी विचार मांडले.

पैठणी क्लस्टर विषयीही परिषदेमध्ये माहिती देण्यात आली. दहा हजार एकर डीएमआयसी प्रकल्पातील २००० एकर क्षेत्र शेंद्रा परिसरात, तर ८ हजार एकर क्षेत्र बिडकीन परिसरात आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड या सर्व क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com