माॅन्सून कोणत्या भागांत अडकला?

माॅन्सूनने पोरबंदर, बडोदा, शिवपुरी, रेवा आणि चुर्क या भागांत बुधवारीही मुक्काम केला. उत्तरेतील काही राज्यांना माॅन्सूनची अद्यापही प्रतिक्षा आहे.
माॅन्सून कोणत्या भागांत अडकला?
Monsoon UpdateAgrowon

माॅन्सूनने (Monsoon) पोरबंदर, बडोदा, शिवपुरी, रेवा आणि चुर्क या भागांत बुधवारीही मुक्काम केला. उत्तरेतील काही राज्यांना माॅन्सूनची अद्यापही प्रतिक्षा आहे तर व्यापलेल्या क्षेत्रात काही भागांत माॅन्सून सक्रिय (Monsoon Activate) झाला. त्यामुळे हलका ते मध्यम पाऊस (Rainfall) पडत आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) हजेरी लावत आहे.

माॅन्सूनने राज्य व्यापून चार दिवस झाले तरी सर्वदूर पावसाची प्रतिक्षा कायम आहे. पावसाला पोषक वातावरण निर्मिती होत नाही. तसेच निर्माण झालेले वातावरण पाऊस पडण्यास पुरेशे नाही. त्यामुळे पुरेसे पोषक हवामान आवश्यक आहे. सोमवारी माॅन्सूने मध्य प्रदेशचा बहुतेक भाग व्यापत संपूर्ण छत्तीगड आणि आंध्र प्रदेश राज्य व्यापले. बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, संपूर्ण ओडिशा आणि पश्चिम बंगाल व्यापले. झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागांतही माॅन्सूनने प्रगती केली. मात्र मंगळवारी आणि बुधवारी माॅन्सूनची वाटचाल थांबली. सध्या पोरबंदर, बडोदा, शिवपुरी, रेवा या भागांत माॅन्सूनची दिशा कायम आहे. अजूनही जवळपास अर्ध्या देशात माॅन्सूनची प्रगती व्हायची आहे.

राज्यात सक्रिय झालेल्या भागात माॅन्सून सरी होत आहेत. मात्र बहुतेक भागांत जोर नाही. पुढील पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात काही भागांत पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. तर दुसरीकडे कमी पाऊस असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये. पुरेशी ओल असल्याशिवाय म्हणजेच ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे आवाहन कृषी विभाग सातत्याने करत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com