Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth
Dr. Panjabrao Deshmukh Krishi VidyapeethAgrowon

Agriculture Exhibition : विद्यापिठातील कृषी प्रदर्शनाचे आज उद्घाटन

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व आत्मा यंत्रणेच्या पुढाकाराने येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आज (ता.२७) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत होत असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV), कृषी विभाग (Agriculture Department) व आत्मा यंत्रणेच्या पुढाकाराने येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे (Agriculture Exhibition) आज (ता.२७) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत होत असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील. अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील. कृषीमंत्री अब्‍दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ, खा. संजय धोत्रे, कुलगुरू डॉ. शरद गडाख, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्यासह आमदार, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्यांची उपस्थिती असेल.

Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth
Abdul Sattar : सत्तारांची हकालपट्टी करून फौजदारी गुन्हा दाखल करा

पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानासह तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळणार आहे. मंगळवारी (ता.२७) कृषी कट्टा - ॲड. अनंत खेळकर, फळबाग, बिजोत्पादन आणि कृषी पर्यटन- मोहन जगताप, कुक्कुटपालन शेतीपूरक उद्योग- रवींद्र मेटकर, कृषी मालाचे कापणी पश्‍चात तंत्रज्ञान -डॉ. प्रमोद बकाने, बुधवारी (ता.२८) कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर- डॉ. सुनील गोरंटीवार (संशोधन संचालक, राहुरी)

Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिदेंवर ‘तो’आदेश मागे घेण्याची नामुष्की

हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान- डॉ. सुरेश धुमाळ (पुणे), कापूस, हरभरा व तूर पिकावरील किडींचे व्यवस्थापन- डॉ. अजय सदावर्ते, हास्याचे तिखे बोल-प्रवीण तिखे, गुरुवारी (ता.२९) आजी-माजी विद्यार्थी सुसंवाद, जीवन अनुभव -भरत गणेशपुरे (अभिनेता), फळ व भाजीपाला निर्यात संधी- विलास शिंदे (नाशिक), कृषी पदवीधरांकरिता संधी व आव्हाने- नरेंद्र पाटील (सोलापूर), औषधी वनस्पती उत्पादन व निर्यात -विजयकुमार लाडोळे,

जैविक कीड निंयत्रण- संगीता सव्वालाखे, उद्योजकता विकास- विवेक तोंडरे, शुक्रवारी (ता.३०) हळद उत्पादन व निर्यात -सुधीर सातपुते, कृषी विकासात महिलांची भूमिका-सरीता वाकोडे, संत्रा लागवड तंत्रज्ञान व निर्यात- डॉ. देवानंद पंचभाई, पोषक तृणधान्य प्रक्रीया तंत्रज्ञान-डॉ. संतोष दिवेकर हे मार्गदर्शन करतील. शनिवारी (ता.३१) प्रधान सचिव (कृषी) एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत व कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com