Beed Railway : स्वप्नपूर्ती झाली, आता विकासाला चालना मिळेल

बीड जिल्ह्यातील आष्टी येथे शुक्रवारी (ता. २३) नगर-बीड-परळी या रेल्वे मार्गावरील नगर ते आष्टी या रेल्वेचा हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला.
Nagar Beed Railway
Nagar Beed RailwayAgrowon

नगर : आष्टी- नगर बीड परळी रेल्वे (Beed Railway) मार्गाच्या नगर ते आष्टी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण (Nagar Beed Railway Inauguration) झाल्याने लोकनेते गोपीनाथराव मुंडे (Gopinath Munde) यांचे आणि जनतेचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे. या भागातून रेल्वे सुरू झाल्याने विकासाला मोठी चालना मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

Nagar Beed Railway
Soybean Production : सोयाबीनचे उत्पादन यंदा घटणार

बीड जिल्ह्यातील आष्टी येथे शुक्रवारी (ता. २३) नगर-बीड-परळी या रेल्वे मार्गावरील नगर ते आष्टी या रेल्वेचा हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला. या वेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे संवाद साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार प्रीतम मुंडे, डाॅ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, माजी आमदार शिवाजी कर्डीले, भीमराव धोंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, की नगर आणि बीड जिल्ह्यांना जोडल्या जाणाऱ्या या रेल्वे मार्गामुळे ग्रामीण दुष्काळी भागात विकासाला चालना मिळणार आहे. राज्याच्या कोणत्याही योजनेसाठी निधी कमी पडणार नाही.

Nagar Beed Railway
Agriculture Credit : बाजार समितीकडून शेतीमाल तारण कर्जासाठी १ कोटीची तरतूद

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की शिवसेना-भाजप युतीचे सरकार हे डबल इंजिन सरकार आहे. यापुढे विकास कामांना वेग येईल. सामान्य लोकांच्या विकासासाठी हे सरकार सदैव काम करत राहील. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी आमच्या सरकारने अनेक योजना ठरवल्या आहेत.

आघाडी सरकारने रेल्वेसाठी येणारे ४०० कोटी थकवले. या सरकारने २४२ कोटी दिले, परंतु तेवढ्यावर भागणार नाही तर अजून निधीची गरज असल्याचे मत या वेळी लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले.

...अशी धावणार रेल्वे

नगरहून सकाळी ७.४५ वाजता सुटेल आणि आष्टीला सकाळी १०.३० वाजता पोहोचेल आणि परतीच्या प्रवासात आष्टी येथून सकाळी ११.०० वाजता सुटेल आणि दुपारी १.५५ वाजता नगर येथे पोहोचेल. ही गाडी रविवार वगळता दररोज धावणार आहे. या मार्गावर कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी आणि नारायणडोह येथे रेल्वेला थांबा असेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com