
कोल्हापूर : ‘कोराडू’, ‘काटे कणंग’, ‘मुंदू चिरके’, ‘कासार अळू’, ‘आळेकोन’ ही सगळी नाव तशी अपरिचित. साहजिकच उत्सुकता वाढवणारी. पण ही आहेत रानकंदमुळे. कोल्हापुरात पहिल्यांदाच कंदमुळांचा उत्सव (Kandmool Festival) भरला आहे. तब्बल साठ प्रकारची कंदमुळे (Tuber) या प्रदर्शनात पहावयास मिळत आहेत.
एनजीओ कम्पॅशन, निसर्ग अंकुर कोल्हापूर, गार्डन क्लब यांच्या पुढाकाराने आणि श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या शहाजी कॉलेजच्या सहयोगाने कोल्हापुरात कंदमुळांचा हा दोन दिवसीय अनोखा उत्सव भरविण्यात आला आहे. गुरुवारी (ता. १२) सकाळी दहा वाजता या उत्सवाला सुरुवात झाली. शहाजी कॉलेजच्या परिसरातील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये हे प्रदर्शन सुरू आहे.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के यांच्या हस्ते या उत्सवाचे उद्घाटन झाले. प्राचार्य डी. आर. मोरे, जिल्हा कृषी अधिकारी उमेश पाटील, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. गीता पिल्लई, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, संयोजक प्राचार्य मधुकर बाचुळकर, मिलिंद धोंड, मोहन माने, कल्पना सावंत, सुशांत टककळकी, अमृता वासुदेवन, मंजिरी कपडेकर, शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण, जयेश ओसवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले.
प्रदर्शनात कणगा, काटे कणग, कोराडू, करांदा, वराहकंद, वासकंद, पासपोळी, शेंडवेल, आळसी, शेवळा, सुरण या वनस्पतींची कंदमुळे, कंदीका आणि कंदक तसेच मोठा कासार अळू, काळा अळू, हिरवा अळू, पांढरा पेरव, उंडे, शेडवाळे असे अळुंचे विविध प्रकार, हळदीचे विविध प्रकार आहेत. प्रदर्शन १३ जानेवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत प्रदर्शन खुले राहील.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.