
Pune News ः पशुखाद्यात (Animal Feed) आघाडीवर असणाऱ्या ‘कन्हैया ॲग्रो’च्या गटेवाडी (ता. पारनेर) येथील विस्तारित नूतन प्रकल्पाचे उद्घाटन शनिवारी (ता. ११) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis), ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून महसूल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार (Popat Pawar), कन्हैया उद्योग समूहाचे संस्थापक शांताराम लंके, तसेच प्रगतिशील शेतकरी या वेळी उपस्थित होते.
कन्हैया ॲग्रोने नवनवीन संशोधन करून नवीन उत्पादने निर्माण करून राज्यभरातील दूध उत्पादकांना दूधनिर्मिती वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.
गटेवाडी येथील प्रकल्पाची २०१७ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. आज त्याचा मोठा विस्तार झाला आहे. प्रति महिना आठ हजार उत्पादन सध्या या प्रकल्पातून बाहेर पडत आहे.
आता नव्याने होणारा प्रकल्प अत्याधुनिक असून, यामुळे प्रति महिना उत्पादनामध्ये नऊ हजार टन वाढ होणार आहे. एकूण उत्पादन १७ हजार टन होणार आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील रोजगाराला चालना मिळाली आहे. विविध गावांतील एकूण ६०० कर्मचारी येथे काम करीत आहेत.
गुणवत्ता जपल्याने सुरुवातीला पारनेर परिसर व स्पर्धेत टिकवण्यासाठी लागणारा नगर जिल्ह्यात असलेली पशुखाद्याची दूध व्यवसायाबरोबरच पोल्ट्री उद्योग एक पूरक व्यवसाय म्हणून पुढे येत असल्याने पोल्ट्री खाद्याचे उत्पादन सुरू केले असल्याची माहिती कार्यकारी संचालक सुरेश पठारे यांनी दिली .
राज्यभरातील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या बाजारात विविध नामंकित कंपन्यांचे पशुखाद्य उपलब्ध आहे. त्याच्या तुलनेत बाजारातील दर्जेदारपणा कायम ठेवल्याने राज्य तसेच परराज्यात मागणी वाढली आहे.
- मच्छिंद्र लंके, अध्यक्ष, कन्हैया उद्योग समूह
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.