Paddy : भातपिकाला संततधारेचा धोका

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भात शेतीसाठी पोषक वातावरण आहे. मात्र हा पाऊस असाच आणखी काही दिवस सुरू राहिल्यास बहरलेल्या भात पिकाला धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे.
Paddy
PaddyAgrowon

अलिबाग ः गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे (Continuous Rain) भात शेतीसाठी पोषक वातावरण (Favorable Climate For Paddy) आहे. मात्र हा पाऊस असाच आणखी काही दिवस सुरू राहिल्यास बहरलेल्या भात पिकाला (Paddy Crop) धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचण्याची शक्यता असून रोपे आडवी पडू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.

जिल्ह्यामध्ये सुमारे ९५ हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकांची लागवड करण्यात आली आहे. फुले, कणसे येण्याच्या मार्गावर भाताची रोपे आहेत. मात्र सततच्या पावसामुळे शेतीत पाणी साचण्याचे, कीड प्रादुर्भावाची शक्‍यता आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती आहे.

Paddy
Paddy bonus : सिंधुदुर्गातील भात उत्पादक बोनसच्या प्रतीक्षेत

कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून शेतांमध्ये जास्त पाणी साचल्यास निचरा करण्यासाठी जागा तयार करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच तयार भाताची रोपे आडवी पडू नये, यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

खालापुरात भातशेती बहरली

समाधानकारक आणि पुरेसा पावसामुळे खालापूर तालुक्यातील भातशेती चांगली बहरली. भाताची कणसे तयार होत असल्याने हिरवीगार भात शेती डौलू लागली आहे. अनियमित पाऊस, चक्रीवादळ व परतीचा पावसाचा धुमाकूळ आदींमुळे शेतकऱ्यांना भातपिकाचे उत्पादन घेणे जिकरीचे होत आहे. या वर्षी आतापर्यंत शेतीला आवश्यक स्वरूपात पाऊस पडत आहे.

Paddy
Paddy : मणिपूरच्या सुगंधी भाताचे रहस्य

औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असले तरी तालुक्यातील केळवली, वणी, बीडखुर्द, उंबरविरा, जांबरुंग, जांबरुंग ठाकूरवाडी, खरवई, घोडीवली, नावंढे, कलोते, नडोदे, निगडोली, चौक, आसरोटी, कोपरी, छत्तीशी विभाग आदी गावासह ग्रामीण भागातील भात शेती मोठ्या प्रमाणात होते.यंदा शेतकऱ्यांनी कोलम, दप्तरी, रत्ना, जया, अवनी, वैष्णवी, कर्जत ३ अशा विविध प्रकारच्या जातीच्या भातपिकाची लागवड केली आहे.

भात शेतीला बहर येण्यास सुरुवात झाली आहे. दाणा भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. सध्या सुरू असलेला पाऊस भात पिकाला पोषक असून कीड रोगाचा परिणाम नसल्याचे चित्र आहे. मात्र सततच्या पावसामुळे शेतांमध्ये जास्त पाणी साचून रोपे आडवी झाल्यास भात पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेतांमध्ये पाणी जास्त साचू न देता निचऱ्यासाठी मार्ग काढावा.
दत्तात्रेय काळभोर, कृषी उपसंचालक, रायगड
सध्याचा पाऊस भात पिकाला समाधानकारक आहे. मात्र सतत पाऊस सुरू राहिल्यास तयार झालेल्या भात रोपांवर परिणाम होऊन रोपे कुजण्याची भीती अधिक आहे.
सदानंद पाटील, शेतकरी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com